'तारक मेहता..' मधील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री मालिका सोडण्याची चर्चा

गेल्या अनेक महिन्यांत या मालिकेतील बऱ्याच कलाकारांमध्ये बदल करण्यात आले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील रोशन सोढीची भूमिका निभावणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाल तब्बेत  बरी नाही.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील रोशन सोढीची भूमिका निभावणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाल तब्बेत बरी नाही.Instagram/@jennifer_mistry_bansiw al

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या प्रसिद्ध टीव्ही मालिका (Series) घरोघरी पोहोचली आहे. या मालिकेतील नट्टू काकाची भूमिका निभावणारे अभिनेते घनश्याम नायक याना कर्करोग झाल्याने त्यांनी काही दिवसांसाठी सुट्टी घेतली आहे. त्यानंतर आता मालिकेतील रोशन सोढीची भूमिका निभावणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री (Jennifer Mistry Bansiwal) बन्सिवाल ही गरोदर असल्याने मालिका सोडण्याची चर्चा सध्या सामाजिक माध्यमांवर (Social Media) सुरू आहे. या चर्चेवर अभिनेत्री जेनिफर हिने एका मुलाखतीत उत्तर दिले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील रोशन सोढीची भूमिका निभावणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाल तब्बेत  बरी नाही.
Hungama 2: चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली..

अभिनेत्री जेनिफर म्हणाली , तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडत असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून मला अनेकांनी फोनस् केले तसेच मॅसेज येत आहेत. त्यात अनेकांनी मला गरोदर असल्याचे देखील विचारले आहे. परंतु असे काहीही नसून माझी तब्बेत अनेक दिवसांपासून बरी नाही. माझ्या पायाला दुखापत झाल्याने मी चालू शकत नाही. याचा कारणांमुळे दमनला सुरू असलेल्या शूटिंगसाठी जाता आले नाही. परंतु मी माझ्या टीमशी संपर्कात आहे. स्वत:च काही गोष्टीचा विचार करून लोक चुकीच्या बातम्या का पसरवत आहेत, मला माहिती नाही.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील रोशन सोढीची भूमिका निभावणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाल तब्बेत  बरी नाही.
रणधीर कपूर ने चूकून शेअर केलेला करीना कपूरच्या मुलाचा पहिला फोटो होतोय व्हायरल

गेल्या अनेक महिन्यांत या मालिकेतील बऱ्याच कलाकारांमध्ये बदल करण्यात आले आहे. अंजली भाभीची भूमिका निभावणाऱ्या नेहा मेहता हिची जागा अभिनेत्री सुनन्या फौजदारने घेतली असून सोढीची भूमिका निभावणाऱ्या गुरचरण सिंगची जागा बलविंदर सिंग सुरी यांनी घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com