Pran Death Anniversary : हिरो पेक्षा जास्त मानधन घ्यायचे; मात्र बॉबीसाठी घेतला होता रुपया

बॉलिवूडचा लोकप्रिय खलनायक असलेले अभिनेता प्राण यांची आज पुण्यतिथी (Pran Death Anniversary) आहे.
Pran Death Anniversary
Pran Death AnniversaryFile Image
Published on
Updated on

Pran Death Anniversary: बरखुदार' हा शब्द ऐकताच अभिनेता प्राणचा चेहरा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. प्राण आपली पत्नी आणि एक मुलगा अरविंद यांच्यासह पाकिस्तानमधून भारतात आले होते. प्राण नावाच्या लोकप्रिय अभिनेत्याचे पूर्ण नाव प्राण किशन सिकंद होते. त्यांना फोटोग्राफर व्हायचं होतं, पण नंतर त्यांनी अभिनयाच्या विश्वात पाऊल टाकलं आणि इथंच त्यांनी आपल्या दमदार कामातून इंडस्ट्रीत स्वत: ची ओळख निर्णाण केली. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर प्राण मुंबईत दाखल झाले होते. (Actor Pran who took more than Hero, however, had taken one rupee for the movie Bobby)

फाळणीपूर्वी प्राण यांनी 22 चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भुमिकेत कास केले होते. त्याचबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी 1942 साली 'खानदान' या चित्रपटातून आगमन केले. प्राण यांनी नेगेटिव रोल्स केले असतील, परंतु चाहत्यांच्या अंतःकरणातील त्याचा आदर एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही. प्राण यांच्या कामाचे आणि अॅक्टींग कौतुक प्रेक्षक आणि त्यांचे चाहते अजूनही करतात. प्राण चित्रपटात खलनायकाची भुमिका साकारत असले तरी निर्माते त्यांना नायकापेक्षा जास्त पैसे द्यायचे.

प्राण हा सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता होते. प्राणपेक्षा जास्त मानधन फक्त राजेश खन्ना यांना मिळत होते. 60 आणि 70 च्या दशकात, दोघांनाही एकाच चित्रपटात घेण्यासाठी टाळत होते. एक काळ असा होता जेव्हा ते अमिताभ बच्चनपेक्षा जास्त मानधन घेत असत.

Pran Death Anniversary
Haseen Dillruba: बोल्ड सीनच्या शूटिंग दरम्यान तापसी पन्नूची घालमेल

बिग बीपेक्षा जास्त मानधन घेत होते

रिपोर्ट्सनुसार बिग बीने डॉन चित्रपटासाठी अडीच लाख रुपये घेतले होते, तर स्क्रीन स्पेस असलेल्या प्राण यांनी ५ लाख रुपये घेतले होते. मात्र प्राण पडद्यावर येताच ते प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची जादू अशा प्रकारे करत असे की प्रत्येकजणांचे ते लक्ष वेधून घेत होते. हेच कारण होते की निर्मातेही प्राण मागतिल तेवढे मानधन द्यायचे.

बॉबीसाठी 1 रुपया

प्राण जरी बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता होते, मात्र ते एक चांगले व्यक्तीमत्व ही होते. प्राणने राज कपूरच्या बॉबी चित्रपटासाठी फक्त 1 रूपया मानधन घेतले होते. कारण राज कपूर यांना प्राणला बॉबी चित्रपटासाठी साइन करण्याची इच्छा होती, परंतु त्यांचा शेवटचा चित्रपट फ्लॉप झाला, ज्यामुळे त्यांना खूप आर्थिक चणचण सहन करावी लागली. या चित्रपटात प्राणला साइन करण्यासाठी जास्त पैसे देता आले नाहीत. प्राणला राज कपूरची अवस्था समजली आणि त्यांनी चित्रपटासाठी फक्त 1 रूपयाचे मानधन घेतले.

Pran Death Anniversary
Video: शाहरुख आणि शाहिदने अवॉर्ड शो मध्ये सुशांत बरोबर केली होती मस्ती

दिसण्याकडेही लक्ष द्यायचे

प्राण त्याच्या अभिनयाबद्दल तसेच त्याच्या लुकबद्दलही बरीच काळजी घेत असे. त्याच्याकडे घरी एक कलाकार देखील होता जो आपल्या इच्छित लुकसाठी काम करायचा. त्यांचा मेक-अप मॅन आणि विग मेकर त्यांच्या लूकवर काम सुरू करायचे. गुमनाम, परवरीश, जंजीर, डॉन आणि शहीद असे काही चित्रपट आहेत, ज्यात त्याच्या कॅरेक्टरचे कपडे आणि स्टाईलिंगमुळे चाहते प्रभावित झाले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्राण यांना ३ वेळा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. 1997 मध्ये त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचवेळी प्राण यांना 2001 मध्ये पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com