Actor Christian Oliver Died: हॉलिवूड स्टार ख्रिस्तियन ऑलिव्हर आणि त्याच्या दोन मुलींचा विमान अपघातात मृत्यू

Actor Christian Oliver Died: या घटनेनंतर चाहत्यांची मनं हेलावली आहेत.
Actor Christian Oliver Died
Actor Christian Oliver DiedSocial Media

Actor Christian Oliver Died: ६ जानेवारीला सकाळी हॉलिवूड स्टार ख्रिस्तियन ऑलिव्हर आणि त्याच्या दोन मुलींचा विमान अपघातात मृत्यू झाला. विमान कॅरेबियन समुद्रात कोसळले. या घटनेनंतर चाहत्यांची मनं हेलावली आहेत. कुटुंबाचीही अवस्था बिकट आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, क्रिस्टियन ऑलिव्हरचे विमान टेकऑफनंतर काही वेळातच कॅरेबियन समुद्रात पडले.

ख्रिस्तियन ऑलिव्हर आणि त्याच्या दोन मुलींना बाहेर काढण्यात आले, परंतु ते मृत झाले होते. ख्रिश्चन ऑलिव्हरला 10 वर्षांची मुलगी होती, तिचे नाव मदिता आणि दुसरी मुलगी 12 वर्षांची होती. त्याचे नाव अॅनिक होते. या घटनेत पायलटचाही मृत्यू झाला.

आता हा अपघात कसा झाला याचा पोलिस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डण केल्यानंतर काहीतरी बिघाड असल्याचा मेसेज पायलटने दिल्याचे म्हटले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com