अभिनेते आणि माजी खासदार अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांचे मंगळवारी 5 आक्टोबर रोजी मध्यरात्री हृदय विकाराच्या (Heart Disorders) झटक्याने निधन झाले. 82 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. रामानंद सागर यांच्या पौराणिक मालिका रामायणमध्ये रावण म्हणून भूमिका यांनी साकारली होती . त्यांनी सुमारे 300 हिन्दी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते 1991 ते 1996 पर्यंत खासदार होते. ज्येष्ठ अभिनेते त्रिवेदी यांचा अंतिम संस्कार आज मुंबईत होणार आहे.
* अनेक कलाकारांकडून अरविंद त्रिवेदी यांना श्रद्धांजली
अरविंद त्रिवेदी यांच्या सहकलाकारांनी त्यांच्या निधनानंतर सोशल मिडियाद्वारे श्रद्धांजली वाहली आहे. रामायण मालिकेत लक्ष्मणचीभूमिका साकारणाऱ्यासुनील लाहिरी यांनी अभिनेत्याची छायाचित्रे शेअर केली आहे आणि लिहिले आहे, " खूप दुखत घटना आहे आता अरविंद भाई आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी ही ईश्वर चरणी प्रार्थना. मी वडीलसमान, मार्गदर्शक, हितचिंतक अश्या व्यक्तीला गमावले आहे."
* दीपिका चिखलिया यांनीही आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर भाविक पोस्ट लिहिली आहे, "अरविंद त्रिवेदी एक् अतिशय उत्तम व्यक्तिमत्व होते. दीपिका चिखलिया यांनी रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारली होती.
* अशोक पंडित, चित्रपट निर्माते आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन दिग्दर्शक संघाचे अध्यक्ष, यांनी ट्विट केले, " सुप्रसिद्ध थिएटर, टीव्ही आणि चित्रपट अभिनेता #अरविंद त्रिवेदी जी यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याचे जाणून दु:ख झाले आहे."
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 19 38 रोजी मध्य प्रदेशात उज्जैन येथे झाला. त्यांनी गुजराती रंगभूमीपासून आपल्या कार्यकिर्दीला सुरुवात केली . रामयण या मालिकेत त्यांनी रावणाची भूमिका साकारली होती. यांच्या भाऊ उपेंद्र त्रिवेदी हेही गुजराती चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव होते. अरविंद त्रिवेदी यांनी गुजरातील प्रेक्षकांमध्ये धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे ओळख मिळवली. येथे त्यांनी 40 वर्ष योगदान दिले. गुजरात सरकारकडून त्यांना गुजराती चित्रपाटांमध्ये अभिनयासाठी सात पारितोषिके दिली. अरविंद त्रिवेदी यांनी 20 जुलै 2002 ते 16 ऑक्टोबर 2003 पर्यंत सीबीएफसीचे प्रमुख म्हणून काम केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.