OTT असो किंवा सिनेमागृह, मनोरंजन महत्त्वाचे : अपारशक्ती स्पष्टच बोलला

अभिनेता अपारशक्ती खुराना इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होता.
Aparajit Khurana host iffi 2023
Aparajit Khurana host iffi 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Aparajit Khurana host iffi 2023 : जगभरातल्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा समजला जाणारा 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) गोव्यात सुरवात झाली आहे.

20 नोव्हेंबरला दुपारी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओपनिंग फिल्म आणि त्यानंतर सायंकाळी रंगारंग उद्घाटन सोहळ्यानंतर आज मंगळवारपासून (21 नोव्हेंबर) नियमित फिल्म्स आणि मास्टरक्लासमधील विविध कार्यक्रमांना सुरूवात होत आहे.

यावर्षीही अपराजीत करणार होस्ट

या सोहळ्यासाठी अभिनेता अपराजीत खुरानाही उपस्थित होता. यावेळी ओटीटी आणि थिएटर्स या विषयावर त्याने स्पष्ट मत मांडले आहे. यंदाच्या इफ्फी सोहळ्यासाठी इतरही अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी अपराजीत इफ्फी होस्ट करणार आहे.

जो चित्रपट लोकांचं मनोरंजन करतो...

अभिनेता अपराजितला जेव्हा समांतर सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमांबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्याने सांगितलं की चित्रपट कोणताही असो जर जो तो लोकांचं मनोरंजन करत असेल तर तो खरा चित्रपट आहे. असा चित्रपट ओटीटीवर येवो किंवा थिएटर्समध्ये, तो व्यावसायिक असो किंवा समांतर काहीही फरक पडत नाही असंही अपराजित म्हणाला

Aparajit Khurana host iffi 2023
iffi 2023 : समांतर की व्यावसायिक चित्रपट? सनी देओलने इफ्फी च्या मंचावर केलं मोठं विधान

करीश्मा तनाही करणार होस्ट

इफ्फीच्या या नेत्रदीपक सोहळ्यासाठी अभिनेत्री करीश्मा तनाही होस्ट करणार आहे. अपराजीत सोबत तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली इफ्फी होस्ट करण्याचा हा माझा पहिलीच वेळ आहे आणि मला अपराजितसोबत होस्ट करण्यात खूप आनंद वाटेल

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com