iffi 2023 : समांतर की व्यावसायिक चित्रपट? सनी देओलने इफ्फी च्या मंचावर केलं मोठं विधान

जगभरातल्या चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचा समजला जाणारा इफ्फी यावर्षीही अनेक कारणांनी खास ठरला आहे.
Sunny Deol
Sunny DeolDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरातल्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा समजला जाणारा 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) गोव्यात सुरवात झाली आहे.

20 नोव्हेंबरला दुपारी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओपनिंग फिल्म आणि त्यानंतर सायंकाळी रंगारंग उद्घाटन सोहळ्यानंतर आज मंगळवारपासून (21 नोव्हेंबर) नियमित फिल्म्स आणि मास्टरक्लासमधील विविध कार्यक्रमांना सुरूवात होत आहे. या कलात्मक सोहळ्याला अभिनेता सनी देओलही उपस्थित होता.

इफ्फीत आला तारासिंह

सनी देओल - 2023 साल आपल्या दमदार गदर 2 ने गाजवलेला बॉलीवूडचा तारासिंह अर्थात सनी देओलने एन्ट्री घेताच मुलाखत घेणाऱ्यांचाही उत्साह वाढला.

सनी देओल इफ्फीत येण्याबद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला "कदाचित अशा ठिकाणी मी पहिल्यांदाच येत आहे.

समांतर सिनेमा की व्यावसायिक

पण मला छान वाटत आहे, इथे ज्यांचे चित्रपट बघायला मिळणार आहेत त्या सगळ्यांना मी ओळखतो कारण मी त्यांच्यापैकीच एक आहे ते खूप मेहनत घेत आहेत, जेव्हा सनी देओलला समांतर सिनेमा की व्यावसायिक सिनेमा अशा दोन प्रकारात चित्रपट विभागले जातात याबद्दल त्याला काय वाटतं? प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सांगितले की मला वाटतं असा भेद असू नये कारण कुठलाही चित्रपट हा मनोरंजनासाठी असतो आणि या सगळ्यामध्ये दोन्ही प्रकारच्या चित्रपटाला प्रेक्षक असतोच.

Sunny Deol
IFFI Opening Ceremony: शाहिद, माधुरी, करण जोहर, सनी देओल; इफ्फीच्या ओपनिंगला कलाकारांची मांदीयाळी

सनीने दाखवला ढाई किलो का हाथ

प्रतिक्रियेच्या शेवटी सनीला त्याचा ढाई किलो का हाथ दाखवण्याची विनंती करण्यात आली. घायल चित्रपटातल्या सनीच्या प्रसिद्ध ये मेरा ढाई किलो का हाथ या डायलॉगला ऐकून उपस्थित प्रेक्षकांचं आणि लाईव्ह एव्हेंट पाहणाऱ्यांचंही मनोरंजन केलं

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com