'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदोचा (Sahadeva Dirdo) मंगळवारी सायंकाळी अपघात झाला. यात तो जखमी झाला आहे. हेल्मेट न घातल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हाधिकारी विनीत नंदनवार आणि एसपी सुनील शर्मा (Sunil Sharma) यांनी रुग्णालयात पोहोचून सहदेवच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे (Doctor) विचारपूस केली. प्राथमिक उपचारानंतर सहदेवला मेडिकल कॉलेज जगदलपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सहदेव मित्रांसह दुचाकीवरुन शबरीनगरच्या दिशेने जात होता. यादरम्यान रस्त्यावरील वाळू आणि गिट्टीमुळे बाईक अनियंत्रितपणे पलटी झाली. हेल्मेट न घातल्याने सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सहदेवला सुकमामधील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी ऑपरेशन दरम्यान डोक्याला पाच टाके टाकले. यानंतर त्याला अधिकच्या उपचारासाठी जगदलपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.
बच्पन का प्यार या गाण्यासाठी इंटरनेट मीडियावर हिट झाला
घटनेची माहिती मिळताच प्रभारी मंत्री कावसी लखमा यांनी जिल्हाधिकार्यांकडून सहदेवची माहिती घेतली. तसेच उपचारासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी पुरविण्याचे आदेश दिले. काही महिन्यांपूर्वी बच्पन का प्यार या गाण्यासाठी सहदेव दीरदो सोशल मीडियावर (Social media) हिट झाला होता. बॉलीवूड गायक बादशाहसोबत एक अल्बम देखील त्याने बनवला होता. ज्याला सोशल मीडियावर खूप हिट झाला होता.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला
सहदेव दिरदोच्या अपघाताच्या वृत्तावर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सुकमाचे जिल्हाधिकारी विनीत नंदनवार यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
एसपी हॉस्पिटलमध्ये पोहोचले
एसपी सुनील शर्मा आणि एएसपी ओम चंदेल यांनी जिल्हा रुग्णालयात पोहोचून डॉक्टरांकडून सहदेवच्या प्रकृतीची माहिती घेतली. उत्तम उपचारांबाबत बोलण्याबरोबरच त्यांनी जगदलपूरला रेफर करुन डॉक्टरांशी संवाद साधला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.