Abhishek Pathak
Shivani Oberoi
Abhishek Pathak Shivani Oberoi Dainik Gomantak

Abhishek Pathak- Shivani Oberoi :'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक गोव्यात करणार लग्न...नवरी कोण आहे माहितेय का?

'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि शिवानी ओबेरॉय लवकरच लग्न करणार आहेत.

Abhishek Pathak and Shivaleeka Oberoi :'दृश्यम 2'चे दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि रिलीज या सर्वांपासुन आता मोकळा झाल्यानंतर अभिषेकने हा निर्णय घेतला आहे 

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेक स्टार्स लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच अनेक सेलेब्सनी लग्नगाठ बांधली आहे.

 अथिया शेट्टी आणि केएल राहुलपासून ते सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीपर्यंत, या सर्वांनी आपापल्या जोडीदारांसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आता या यादीत आणखी एका जोडीचे नाव जोडले गेले आहे.

 सुपरहिट चित्रपट 'दृश्यम 2' चे दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय यांची जोडी गेले कित्येक दिवस चर्चेत होती. दोघांच्या लग्नाची मोठी बातमी समोर आली आहे. अभिषेक आणि शिवालिका खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अभिषेक पाठकने शिवालिका ओबेरॉयला तुर्कीमध्ये लग्नासाठी प्रपोज केल्याचे बोलले जात आहे. आता दोघेही लग्न करणार आहेत अशा माहिती मिळाली आहे.

Abhishek Pathak
Shivani Oberoi
HBD Sushant Singh Rajput: सुशांतला वेळ कमी मिळाला पण त्याचं काम सगळ्यांच्या लक्षात राहिलं..

अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न करणार आहेत. दोघांचे लग्न गोव्यात होणार आहे. मात्र, दोघांच्या लग्नाबाबत कोणतीही तारीख समोर आलेली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांच्या लग्नाचा हा सोहळा दोन दिवस चालेल आणि फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. त्याचबरोबर या दोघांच्या लग्नाला बॉलिवूडचे काही मोठे स्टार्सही हजेरी लावू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com