Har Ghar Tiranga: चित्रपटावरून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या आमिरचा तिरंग्यासह फोटो व्हायरल

Azadi ka Amrit Mahotsav: पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासियांना त्यांच्या घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर अनेक सेलिब्रिटी तिरंगा मोहिमेच्या समर्थनार्थ बाहेर आले.
Har Ghar Tiranga| aamir Khan
Har Ghar Tiranga| aamir KhanDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याचा चित्रपट 11 ऑगस्टलाच थिएटरमध्ये रीलीज झाला होता. दरम्यान, आमिर नुकत्याच काही कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. आमिर खानबद्दल असे बोलले जात आहे की तो भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेला पाठिंबा देत आहे .

सोशल मीडियावर (Social Media) आमिर खानचा एक फोटो (Photo) समोर आला आहे. ज्यामध्ये आमिर खान आपली मुलगी इरा खानसोबत बाल्कनीत उभा दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या फोटोत त्यांच्या बाल्कनीच्या रेलिंगला भारतीय तिरंगा बांधलेला दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच आमिर खान 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) मोहिमेला पाठिंबा देत असल्याचे सांगण्यात आले. समोर आलेल्या या फोटोबद्दल लोक आमिरचे कौतुक करत आहेत.

याआधीही अनेक बॉलिवूड (Bollywood) स्टार्स या मोहिमेला सपोर्ट करताना दिसले आहेत. अलीकडेच अक्षय कुमारने(Akshay Kumar) आपल्या ट्विटर प्रोफाइलवर तिरंग्याचे छायाचित्र टाकताना लिहिले की, 'स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा अमृत महोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे.

तेलुगू सुपरस्टार महेश बाबू यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले, 'आमचा तिरंगा... आमचा अभिमान. 13 ते 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घराघरात आपला तिरंगा फडकवत ठेवण्याची शपथ घेऊया.

याशिवाय आर माधवन आणि सुष्मिता सेन या स्टार्सनाही स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा फडकवण्याचे समर्थन करताना दिसले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com