Independence Day: शाहरुख-सलमानसह या स्टार्सनी दिल्या स्वातंत्र्य दिनाचा खास शुभेच्छा

Bollywood News: भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असुन बॉलिवूडमध्येही यानिमित्ताने सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे.
Independence Day| Bollywood Stars
Independence Day| Bollywood StarsDainik Gomantak

आज देशभरात स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातच नाही तर प्रत्येक घरावर तिरंगा फडकवत आहे. या स्वातंत्र्याचा जल्लोष बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. शाहरुख खान, सलमान खानपासून ते अजय देवगणपर्यंत प्रत्येकजण आपापल्या खास पद्धतीने चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

देशातील प्रत्येक घराघरात तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहीम राबवली जात आहे. ज्यामध्ये केवळ सामान्य लोकच नाही तर बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रिटी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहेत. बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानने स्वातंत्र्य दिनानिमित्त पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन आणि अबराम यांच्यासह 'मन्नत'वर तिरंगा फडकावला.

Independence Day| Bollywood Stars
10 वर्षांनंतर! 'टायगर 3' मध्ये सलमान-कतरिनाची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार

अजय देवगणने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.यामध्ये संपूर्ण क्रू मेंबरला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दबंग स्टार सलमान खान यापूर्वीच Galaxy Apartments मध्ये तिरंगा लावून पंतप्रधान मोदींच्या घरोघरी तिरंगा मोहिमेत सामील झाला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सलमान खानने तिरंगा फडकावत एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मलाइका अरोराने देखिल फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिषेक बच्चनेही झेंडा फडकवतानाचा फोटो शेअर करून चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने तिरंगा फडकवत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या या खास प्रसंगी ईशा गुप्ताने स्वातंत्र्याच्या रंगात दिसली आणि हातात तिरंगा उंचावून देशवासियांना शुभेच्छा दिल्या

अनुष्का शर्माने विराटसह फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com