'72 Hoorain' ला सेन्सॉर बोर्डाने नाकारले म्हणून काय झाले? निर्मात्यांनी ट्विटरवर उडवला ट्रेलरचा बार, पाहा व्हिडिओ

72 हुरैन या चित्रपटाचा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.
'72 Hoorain
'72 HoorainDainik Gomantak
Published on
Updated on

72 hoorain official trailer release:  72 हुरेन चित्रपटा घोषणा होताच चांगलाच चर्चेत होता. पण सेन्सॉर बोर्डाने (CBFC) '72 हुरेन' चित्रपटाचा ट्रेलर आक्षेपार्ह ठरवून सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. यानंतरही निर्मात्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचा दमदार टिझर रिलीज केला आहे. 

  • 72 हुरें चा ट्रेलर रिलीज 

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दहशतवादाच्या अंधाऱ्या दुनियेचे सत्य दाखवण्यात आले. ट्रेलरनुसार, दहशतवादी आधी लोकांचे ब्रेनवॉश करतात. यानंतर ते निष्पाप लोकांचे प्राण घेण्यास भाग पाडतात. दहशतवाद्यांचा असा विश्वास आहे की जी व्यक्ती आपल्या प्राणाची आहुती देऊन लोकांचे जीवन उद्ध्वस्त करते, त्यांना खुदा स्वर्गात आश्रय देतो.

या चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देण्यास नकार दिल्याने '72 हुरैन' चित्रपट आता सिनेमागृहात रिलीज होऊ शकणार नाही. आज निर्मात्यांनी डिजिटल पद्धतीत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी '72 हुरैन' या चित्रपटाची ची घोषणा झाली होती. धर्मांतरण, दहशतवादी संघटना आणि निष्पाप लोकांचे ब्रेनवॉश करुन त्यांच्याकडून दहशतवादी काम कसं करुन घेतलं जातं, अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा '72 हुरैन' हा चित्रपट आधारित आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर पास करण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. त्यांनी या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. 

  • '72 हुरॉन' मध्ये सेन्सॉरमध्ये काय अडचण आहे?

'72 हुरैन'च्या ट्रेलरमधून ‘कुराण का’ शब्द वगळण्यासोबतच बॉम्बस्फोटाच्या दृश्यात तुटलेल्या पायाचे दृश्य काढण्याचे सेन्सॉर बोर्डाने आदेश दिले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य अशा मुद्द्यांवर वाद सुरू झाला आहे. त्यामुळे आता '72 हुरैन' या चित्रपटाचे निर्माते हैराण झाले असून आता ते सेन्सॉर बोर्डाच्या वरिष्ठांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. 

  • हा चित्रपट खऱ्या कथेवर आधारित

चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारित आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला होता की हा चित्रपट 'द केरळ स्टोरी' सारखाच आहे. हा चित्रपट त्या तरुणांची कथा आहे ज्यांचे ब्रेनवॉश करून सुसाइड बाॅम्बर बनवले जाते..

  • या दिवशी होणार रिलीज

पवन मल्होत्रा, आमिर बशीर, रशीद नाज, अशोक पाठक हे '72 हुरेन' चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 7 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची खुर्ची पूरण सिंग चौहान यांनी सांभाळली आहे. ज्यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची निर्मिती गुलाब सिंग तन्वर यांनी केली आहे. अनिरुद्ध तन्वर, किरण डागर आणि अशोक पंडित हे सहनिर्माते आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com