भारतीय चित्रपट हा जागतिक चित्रपटांपेक्षा वेगळा. कथानक, अभिनय, डान्स या सगळ्याच बाबतीत चित्रपट वेगळा ठरतो. भारतीय चित्रपट आणि संगीत यांचं एक अनोखं नातं आहे. गोड गाण्यांशिवाय भारतात चित्रपटाची कल्पना निर्माते, दिग्दर्शक आणि प्रेक्षकसुद्धा करु शकत नाहीत.
2022 या वर्षीही बॉलिवूडने अनेक गोड गाणी दिली आहे. या गोड गाण्यांमधुन आपल्या लाडक्या अभिनेत्याला बघणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी असते. चला तर पाहुया 2022 ची ती गाणी ज्यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसु आणलं.
केसरिया
2022 चा हिट ठरलेला ब्रह्मास्त्र केवळ कथा आणि अभिनयाच्या जोरावर नाही तर केसरिया या सुंदर गाण्यामुळेसुद्धा लक्षात राहिलं. अरिजित सिंहच्या मखमली आवाजातल्या केसरियाने इंन्स्टावर तर धुमाकुळ घातला होता. हे गाणं अमिताभ भट्टाचार्य याने लिहलं असुन प्रितमने गाण्याला संगीत दिलं आहे.
मेरी जान
अलिया भट्ट 2022 साली अनपेक्षितरीत्या एका आव्हानात्मक भुमीकेत दिसली. गंगुबाई काठियावाडीतली गंगा साकारताना अलिया भट्टने आपण संयत अभिनय करु शकतो हे दाखवुन दिलं आहे. शरीरविक्री करणारी गंगु जेव्हा हळवी बनुन प्रेमगीत गाते तेव्हा प्रेक्षकही सुखावुन जातात. 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटातलं मेरी जान हे गाणं प्रेक्षकांना वेड लावुन गेलं.नीती मोहनन गायलेलं हे लयदार शैलीतलं हे गाणं कुमार याने लिहलं आहे तर या गाण्याला संजय लीला भन्साळीचंं संगीत आहे.
कहाणी
2022 साली बॉयकॉटचा सामना करावा लागलेला चित्रपट म्हणजे आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही पण या चित्रपटातलं कहानी हे गाणं मात्र चांगलंच भाव खाऊन गेलं. प्रितमची नेहमीची मेलेडियस स्टाईल त्याने याही गाण्यात वापरली आहे. हे गाणं मोहन कन्ननने गायलं असुन अमिताभ भट्टाचार्य याने लिहलं आहे. हा चित्रपट प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप' चा रिमेक आहे.
जिंद मेरीये
अभिनेता शाहिद कपूर याचा 'जर्सी' 2022 साली येवुन गेला. जावेद अलीने गायलेलं हे गाणं शेलीने लिहलेलं असुन हे याचं संगीत सचेत- परंपरा यांचं आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा हा चित्रपट या दोघांशिवाय या गाण्यामुळेही लक्षात राहिल हे नक्की.
अपना बनाले
वरुण धवन आणि क्रिती सेनन यांचा भेडिया हा चित्रपटही 2022 साली रिलीज झाला. या चित्रपटातलं 'अपना बनाले' हे गाणं प्रेक्षकांनी खुप पसंत केलं आहे. हे गाणं अमिताभ भट्टाचार्यने लिहलं असुन अरिजीत सिंहच्या आवाजात हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. सचिन - जिगरने या गाण्याला संगीत दिलं आहे.
फितुर
रणबीर कपुरचा शमशेरा 2022 सालच्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक होता पण फितुर या गाण्याने मात्र चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहण्यासाठी मदत केली आहे असंच म्हणावं लागेल. थोडक्यात चित्रपट लक्षात राहावा म्हणुन गाण्यांची जबाबदारी मोठीच असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.