12th Fail: '12th फेल' ने रचला इतिहास! ठरला 'या' यादीत असणारा एकमेव हिंदी चित्रपट

12th Fail: ओटीटीनंतर आता हा चित्रपट संपूर्ण जगात आपली जादू पसरवत आहे. विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Vikrant Massey
Vikrant MasseyDainik Gomantak
Published on
Updated on

12th Fail: विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असलेला 12th फेल हा चित्रपट रिलिज झाल्यापासून कौतुकास पात्र ठरत आहे. चाहत्यांबरोबरच बॉलीवूडच्या बडे कलाकार चित्रपटाचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे फॅन झाल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. आता या चित्रपटाच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्लोबल IMDB च्या टॉप 250 चित्रपटांच्या यादीत विक्रांतचा हा एकमेव हिंदी चित्रपट आहे, 50 व्या स्थानावर 12th फेलने बाजी मारली आहे.

विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर स्टारर '12 फेल' हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटगृहांमध्ये हिट ठरलेला हा चित्रपट आता OTT वर लोकांची मने जिंकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरातील टॉप हॉलीवूड चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. हा बॉलीवूड चित्रपट ग्लोबल आयडीबीमधील चित्रपटांच्या यादीत सर्व मोठ्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये चमकत आहे.

हा चित्रपट केवळ 20 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, ज्याने थिएटरमध्ये 66.55 कोटी रुपये कमावत सुपरहिट ठरलेला हा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे प्रेक्षकांना खूप आनंद झाला. ओटीटीनंतर आता हा चित्रपट संपूर्ण जगात आपली जादू पसरवत आहे. विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

IMDB च्या 250 चित्रपटांच्या यादीत 'ओपनहायमर', 'स्पायडरमॅन: एक्रोस द स्पायडर व्हर्स', 'ग्लॅडिएटर', 'द लायन किंग', 'टॉय स्टोरी' सारखे अनेक उत्कृष्ट चित्रपट आहेत.

दरम्यान, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा चंबळ येथील रहिवासी आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांची आहे. गरीब कुटुंबातील सामान्य मुलगा, जो बारावीत नापास होतो पण असे काही घडते की तो पोलीस ऑफीसर बनण्याची स्वप्ने बघायला सुरुवात करतो. त्यानंतर आयपीएस होण्यापर्यंतचा त्यांच्या संघर्ष हा या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com