Oscar: '12th Fail' अन् हिनाचा 'कंट्री ऑफ ब्लाइंड' ऑस्करच्या शर्यतीत

Oscar: 'ओपेनहायमर आणि बार्बी सारख्या चित्रपटांसह या यादीत कंट्री ऑफ ब्लाइंडचा समावेश होणे ही आमच्या चित्रपटासाठी मोठी उपलब्धी आहे.
Oscar
OscarDainik Gomantak

Oscar: चित्रपटांसाठी ऑस्कर हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. आता यंदाच्या 'ऑस्कर 2024' बाबत चर्चा सुरू झाली आहे. भारतातील असे अनेक चित्रपट आहेत जे या पुरस्काराच्या विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत, त्यापैकी एक विक्रांत मेस्सीचा '12 वी फेल' देखील आहे.

विधू विनोद चोप्राचा '12वा फेल', हिना खानचा 'कंट्री ऑफ ब्लाइंड' आणि मल्याळम स्टार आणि निर्माता टोविनो थॉमसचा चित्रपट '2018' याशिवाय 265 चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी दावेदार आहेत.

'द हॉलिवूड रिपोर्टर'ने या 265 चित्रपटांची यादी शेअर केली आहे. या चित्रपटांची स्पर्धा 'ओपेनहाइमर', 'बार्बी' आणि 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' सारख्या भक्कम हॉलीवूड चित्रपटांशी आहे.

यावर बोलताना हिना खानने म्हटले आहे की, मतदानाच्या आधारे ऑस्करसाठी या चित्रपटाची निवड होणे ही एक मोठी संधी आहे. 'ओपेनहायमर आणि बार्बी सारख्या चित्रपटांसह या यादीत कंट्री ऑफ ब्लाइंडचा समावेश होणे ही आमच्या चित्रपटासाठी संपूर्ण टीमसाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.

'कंट्री ऑफ द ब्लाइंड' ही एका गिर्यारोहकाची कथा आहे जो 1,000 फूट उंच खडकावरून पडतो आणि अशा दरीत पोहोचतो जिथे फक्त अंध लोक राहतात. या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये हिना खान, शोएब निक शाह, अनुष्का सेन, नमिता लाल, प्रद्युम्न सिंग, मल्ल इनामुलहक आणि जितेंद्र राय यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील 13 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

याशिवाय '12वी फेल' हा खऱ्या कथेवर आधारित चित्रपट आहे. यात आयपीएस अधिकारी मनोज कुमार यांची कहाणी दाखवण्यात आली आहे, चंबळच्या एका गावात राहणारा मुलगा, जो एकदा १२वीत नापास होतो, तो कसा आयपीएस होतो. या चित्रपटात विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत दिसला होता. आता ऑस्करमध्ये कोणता चित्रपटात बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com