10 years of YJHD: दहा वर्षानंतर अयानचा 'ये जवानी है दिवानी' बाबत केला मोठा खुलासा, थेट ब्रह्मास्त्रशी तुलना करत म्हणाला...

'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचवेळी दिग्दर्शक अयान मुखर्जीने यानिमित्ताने अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे शेअर केले आहेत.
10 years of YJHD:
10 years of YJHD:Dainik Gomantak
Published on
Updated on

Yeh Jawaani Hai Deewani: अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण झाली आहे. अजुनही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटामधील गाण आजसुद्धा चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आणि आदित्य रॉय कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, अयान मुखर्जीने एक भावनिक नोट शेअर केली आहे. तसेच, हा त्याचा आजपर्यंतचा सर्वात अविस्मरणीय चित्रपट म्हणून पाहिला गेला आहे. 

  • 'ये जवानी है दिवानी'ला 10 वर्षे पूर्ण

'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाच्या रिलीजला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अयानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अयानने याला त्याचे दुसरे मुलं म्हटले आहे. तसेच लोक अजूनही त्याच्या चित्रपटाचे खूप कौतुक करतात. हे सांगितले आहे. 2013 मध्ये आजच्या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला होता.

  • अयानने पोस्टमध्ये काय लिहिले

व्हिडिओ शेअर करताना अयान मुखर्जीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ये जवानी है दिवानी - माझे दुसरे मूलं, माझ्या हृदयाचा आणि आत्म्याचा तुकडा आज 10 वर्षांचा झाला आहे. मला वाटते इतक्या वर्षांनंतर मी आत्मविश्वासाने सांगू शकेन की हा चित्रपट बनवणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद होता. त्याच्या साध्या गोष्टींसह आम्ही जे काही साध्य केले ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.'

10 years of YJHD:
Sara Ali Khan Viral Video: सारा अली खान मध्य प्रदेशातील महाकालच्या चरणी लीन,पाहा व्हिडिओ
  • ब्रह्मास्त्राशी केली तुलना

अयान मुखर्जीने पुढे लिहिले की, 'आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो रिलीज झाल्यापासून, मला असे वाटत नाही की मी 'ये जवानी है दीवानी' सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिली आहे, परंतु आता मी मोठा आणि शहाणा झालो आहे' म्हणून मला वाटते की मी पाहीन. कारण मी कोण होतो आणि मी जीवनाकडे कसे पाहिले याचा एक मोठा भाग या चित्रपटात कायमचा टिपला गेला आहे. 

अलिकडच्या काही महिन्यांत, मी अनेकदा पाहिले आहे की लोक मला ओळखतात आणि माझ्याकडे येतात… आणि मला वाटते की ते ब्रह्मास्त्राबद्दल काहीतरी बोलतील, परंतु ते 'ये जवानी है दिवानी'बद्दल बोलतात. मी त्या सर्व लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो ज्यांनी अनेक वर्षांपासून चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com