सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरू झालेली लव्ह स्टोरी, रेल्वे प्लॅटफॉर्मवर संपली! तरुणीच्या अपहरण प्रकरण एकाला अटक

Social Media: 17 वर्षीय मुलीची नंतर सुटका करण्यात आली आणि तिचे अपहरण केल्याच्या आरोपावरून एका तरुणाला व्यक्तीला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Youth Arrested Allegedly Kidnapping A Teenage Girl Whom He Befriended On A Instagram.
Youth Arrested Allegedly Kidnapping A Teenage Girl Whom He Befriended On A Instagram.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Youth Arrested Allegedly Kidnapping A Teenage Girl Whom He Befriended On A Instagram:

रेल्वे पोलिसांनी एका 23 वर्षीय तरुणाला एका मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या आरोपीची आणि मुलीची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण स्थानकावर 18 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. त्यानंतर 17 वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली आणि तिचे अपहरण केल्याच्या आरोपावरून रविवारी त्या तरुणाला अटक करण्यात आली, असे जीआरपीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मुंबईतील धारावी येथील रहिवासी असलेली ही तरुणी सोलापूरहून गदग एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करत होती. पोलिसांनी नंतर तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, मुलगी ट्रेनमधून खाली उतरताना आणि कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एकटी फिरताना दिसली.

Youth Arrested Allegedly Kidnapping A Teenage Girl Whom He Befriended On A Instagram.
Watch Video: मानवी तस्करांच्या तावडीतून सुटलेले 17 जण अखेर मायदेशी; नातेवाईकांना पाहताच अश्रू अनावर

पोलिसांनी तिचा मोबाइल नंबर आणि माहिती देणाऱ्यांच्या मदतीने तपास केला आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एका तरुणाने मुलीचे अपहरण केल्याची माहिती मिळाली. जीआरपीने सांगितले की, पोलिसांचे पथक कर्जतमधील आरोपीच्या घरी पोहोचले जेथे मुलगी सापडली.

Youth Arrested Allegedly Kidnapping A Teenage Girl Whom He Befriended On A Instagram.
Goa Education News: वैद्यकीय शिक्षणाकडे गोव्याच्या विद्यार्थ्यांचा कल कमी?; NEET-UG साठी सर्वाधिक अर्ज महाराष्ट्रातून

मुलीची सुटका करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी कुणाल रवींद्र रातंबे याला अपहरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक तपासात ही मुलगी आणि आरोपीची इंस्टाग्रामवर मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bihar Minor Girl Harassment Viral Video
UN General Assembly Viral Video Syria Leader Phone
Mapusa Kidnapping Cases 2026
Ahmedabad Crime News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com