छत्रपती संभाजीराजे भाजप सोडणार?

छत्रपती संभाजीराजे हे भाजप पक्षीय चौकटीत न अडकल्याने भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता नसल्याचे संकेत मिळत आहेत.
Chatrapati Sambhajiraje
Chatrapati SambhajirajeDainik Gomantak

संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे. याबाबत सोमवार (दि. १४) रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ते मराठा आरक्षण आंदोलनाच्या दिशेबाबत भुमिका स्पष्ट करणार आहे.खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोठा निर्णय घेतला असून त्यांनी त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असणार आहे याबाबतची माहीती देणार आहे. त्यामुळे उद्या ते नेमका कोणता मोठा निर्णय जाहीर करतात याबाबतच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे.

Chatrapati Sambhajiraje
'गोव्यात पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करणार', फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

खासदार छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांनी अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं आणि उपोषणे देखील केली. याशिवाय मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून त्यांनी सरकारपुढे 5 मागण्या सुध्दा ठेवल्या होत्या. मात्र सरकारणे त्या मागण्यांची अद्यापही पुर्ताता केली नाही.

संभाजीराजे भाजप सोडणार?

संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत ही येत्या जून महिन्यामध्ये संपत आहे. छत्रपती संभाजीराजे हे भाजप (Bjp) पक्षीय चौकटीत न अडकल्याने भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे त्यांची आगामी राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार यावरुन चर्चा सुरु असतानाच नुकत्याच त्यांनी त्यांच्या वाढदिवसा निमीत्त लिहिलेल्या फेसबूक पोस्टमधून चर्चांना अधिकच उधान प्राप्त झाले. यातूनच ते भाजपची साथ सोडणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमके काय म्हटले होते संभाजीराजे छत्रपती यांनी?

आज वयाची 51 वर्षे पूर्ण करून 52 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्री शिवछत्रपती महाराजांच्या वैभवशाली वंशपरंपरेत माझा जन्म झाला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मात्र याबरोबरच लोककल्याणाचे दायित्वही जन्मतःच आपल्यावरती येते, याचीही मला सर्वथा जाणीव आहे. छत्रपती घराण्याचा हा लोककल्याणाचा वारसा समर्थपणे पेलण्यासाठी श्री शिवछत्रपती महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या विचारांची आस घेऊन मी सदैव कार्यरत आहे.

माझ्या जीवनात आलेली प्रत्येक संधी ही मी लोककल्याणाचे साधन म्हणूनच स्वीकारली व त्याकरिताच ती वापरली देखील! माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील, मात्र माझ्या घराण्याच्या विचारांशी निष्ठा ठेऊन, पूर्वजांनी माझ्यावर सोपविलेल्या माझ्या जन्मजात कर्तव्याचे निर्वहन करण्यासाठी मला गरज आहे ती आपणा सर्वांच्या विश्वासाची व भक्कम पाठबळाची....

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com