उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गुरुवारी मुंबईत (Mumbai) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेतली आहे यावेळी गौतम अदानी यांनी मुख्यमंत्र्यांना ताजपूर बंदरात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे . एप्रिल 2022 मध्ये कोलकाता (Kolkata) येथे बंगाल ग्लोबल बिझनेस समिट देखील होणार आहे.याआधी ममता बॅनर्जी आणि गौतम अदानी यांची भेट गुंतवणुकीसंदर्भात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बंगाल बिझनेस समिटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना आमंत्रित केले होते.(west Bengal CM Mamata Banerjee met businessmen Gautam Adani)
गौतम अदानी यांनी आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. बंगालमधील वेगवेगळ्या गुंतवणुकीबाबत मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे . बंगाल बिझनेस समिटमध्ये सहभागी झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे . सीएम ममता बॅनर्जी या बिझनेस समिटसंदर्भात इतर पक्षांच्या नेत्यांना सतत भेटत आहेत.
नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तीन दिवस मुंबईत पोहोचलेल्या सीएम बॅनर्जी यांनी एकाही काँग्रेस नेत्याची भेट घेतली नाही. ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. परदेशात बसून राजकारण करता येत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या . यासोबतच यूपीए अस्तित्वात नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. मात्र, काँग्रेसला वेगळे ठेवून कोणताही पर्याय देण्याचा प्रयत्न नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. सर्वांना सोबत घेऊन पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सीएम ममता बॅनर्जी यांनी आतापासून बंगाल बिझनेस समिटची तयारी सुरू केली आहे. आपल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ती यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात येथील व्यावसायिकाला भेटणार आहेत त्यासोबतच या सर्वांना ती बंगाल समिटसाठी आमंत्रित करणार आहेत .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.