Inspiring Video: 'शिकण्याची जिद्द' याला म्हणतात! शाळेत जाणाऱ्या आजीबाईंचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, "एक नंबर..."

Viral News: सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही आजीबाई शाळेच्या पेहरावात, हातात पुस्तके घेऊन आनंदाने शाळेत जाताना दिसत आहेत.
Inspiring Video
Inspiring VideoDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही ज्येष्ठ महिला शाळेच्या पेहरावात, हातात पुस्तके घेऊन आनंदाने शाळेत जाताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह, लहान मुलांप्रमाणे शिकण्याची ओढ आणि स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद पाहून अनेक नेटिझन्स भावूक झाले आहेत. वयाची चक्काठ नाही, आयुष्याच्या संध्याकाळीतही शिकण्याची इच्छा जागृत राहू शकते, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील @sidiously_ या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी शाळा "आजीबाईंची शाळा" म्हणून ओळखली जाते. शिक्षणासाठी वयाची अट नसावी, या विचारातून मूळचा मुरबाड येथील योगेंद्र बांगर यांनी या शाळेची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, ही शाळा शनिवारी आणि रविवारी चालते आणि येथे सर्व ज्येष्ठ महिलांना पूर्णपणे मोफत मूलभूत शिक्षण दिले जाते.

Inspiring Video
Goa Politics: 'पणजीचे आमदार लोकांचे प्रश्‍न ऐकत नाहीत'! पर्रीकरांचे टीकास्त्र; पार्किंग समस्येवरुन साधला निशाणा

विविध कारणांमुळे, घरगुती जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी किंवा त्या काळातील परिस्थितीमुळे या महिलांना बालपणात शाळेत जाण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र आज, त्यांची ही अपूर्ण राहिलेली इच्छा "आजीबाईंच्या शाळेत" पूर्ण होताना दिसत आहे. शिकण्याच्या या अदम्य इच्छेने वय, मर्यादा आणि परिस्थिती या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.

या व्हिडिओवर सोशल मीडियावर कौतुक आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांचा ओघ सुरू झाला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, "सोशल मीडियावर यापेक्षा सकारात्मक आणि सुंदर काही पाहायला मिळूच शकत नाही." दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, "हे पाहून मन भरून आले, प्रेरणा दिल्याबद्दल सलाम." तर आणखी एकाने लिहिले, "या आजींबरोबर बसून मीही काहीतरी नवीन शिकावं असाच विचार मनात येतो."

Inspiring Video
Goa ZP Election: ‘मये’त जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे जोरात! फॉरवर्ड, काँग्रेसचे उमेदवार निश्चित; दक्षिण गोव्यात भाजपची चाचपणी

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तनाचा नवा मार्ग उघडत असल्याचे अनेकांचे मत आहे. "आजीबाईंची शाळा" हे फक्त शिक्षणाचे ठिकाण नाही, तर आत्मविश्वास, स्वाभिमान, स्वप्नपूर्ती आणि नव्या सुरुवातीचे केंद्र बनले आहे. आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांची जिद्द सांगून जाते, "शिकणे कधीच थांबू नये, कारण स्वप्नांना वय नसते!"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com