ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे आज वयाच्या 88व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांनी अनेट नाटके, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सावरकर यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.
गेल्या 15 दिवसांपासून सावरकर यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली व त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षीच मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवले.
प्रेमा तुझा रंग कसा', 'कथा नव्या संसाराची', 'बदफैली', 'वरचा मजला रिकामा', 'व्यक्ती आणि वल्ली’, 'सौजन्याची ऐशी तैशी' अशी त्यांची अनेक नाटके गाजली.
सावरकर यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. "मराठी नाटक, मालिका, चित्रपट तसेच ओटीटी अशा सर्व माध्यमातून आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे दुःखद निधन झाले आहे."
"त्यांच्या जाण्याने दोन पिढ्यांना जोडणारा मार्गदर्शक दूवा निखळला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच सावरकर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता शक्ती देवो हीच प्रार्थना." असे ट्वीट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.