Maharashtra: उर्फीनं पून्हा केला चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra: पून्हा या वादाने तोंड वर काढले आहे.
Chitra wagh 
Urfi Javed
Chitra wagh Urfi JavedDainik Gomantak

Maharashtra: भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ आणि बिग बॉस फेम उर्फी जावेद यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहे. गेल्या काही दिवसात हा वाद मिटल्याचे दिसत होते. मात्र आता पून्हा या वादाने तोंड वर काढले आहे.

सोशल मीडियावर सध्या शिवसेना( Shivsena ) आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर( Social Media ) येताच चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनीदेखील ट्विट करत शीतल म्हात्रेंना आपला पाठींबा जाहीर केला आहे. आता उर्फीनं यावर वक्तव्य केले आहे.

Chitra wagh 
Urfi Javed
Government Scheme: मुलींसाठी आनंदाची बातमी, सरकार देतेय तब्बल 75,000 रुपये!

माझ्या कपड्यामुळं माझ्या चारित्र्यावर बोट ठेवत मला जेलमध्ये पाठवण्यात यावं याची मागणी चित्रा वाघ करत होत्या. सर्वासमोर माझं डोकं फोडण्याची धमकी देत होत्या. नैतिकतेचीही काहीतरी सीमा असते हे कोणी तरी चित्रा वाघ यांना सांगा असं उर्फीनं म्हटले आहे.

उर्फीच्या वक्तव्यानंतर आता चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार हा वाद वाढणार की इथेच संपणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com