Unlock Mumbai: मुंबईकरांसाठी चौपाट्या, उद्याने रात्री 10 पर्यंत खुली

एकदंर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येतांना दिसत आहे
Unlock Mumbai: मुंबईकरांसाठी चौपाट्या, उद्याने रात्री 10 पर्यंत खुली
Unlock Mumbai: मुंबईकरांसाठी चौपाट्या, उद्याने रात्री 10 पर्यंत खुली Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईमध्ये कोरोनाची रुग्ण (Corona patient) संख्या कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच कालपासून कोरोना लसीचे (Corona vaccine) दोन डोस घेतलेल्या लोकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली गेली आहे. मुंबईतील दुकानांच्या वेळा वाढविल्या असून मॉल (Mall) , रेस्टॉरंट (Restaurant) खुली केली आहेत. एकदंर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येतांना दिसत आहे. या दरम्यान मुंबई महानगरपालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Unlock Mumbai: मुंबईकरांसाठी चौपाट्या, उद्याने रात्री 10 पर्यंत खुली
मुंबई विद्यापीठ उडवण्याची धमकी देणारा माणूस पोलिसांच्या ताब्यात

मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) क्षेत्रातील मैदाने, चौपाट्या (beaches), उद्यानं (Park) सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार असल्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासाठी पर्यटकांना (Tourists) बंदी घालण्यात आली होती. तसेच मैदान आणि उद्यान दुपारच्या वेळात बंद ठेवण्यात आली होती. परंतु आता मैदाने, चौपाट्या, उद्यानं सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Unlock Mumbai: मुंबईकरांसाठी चौपाट्या, उद्याने रात्री 10 पर्यंत खुली
...तर महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन होणार; मुख्यमंत्री ठाकरेंचा सुतोवाच

मुंबई शहरात (Mumbai) आता कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी महापालिका आणि राज्य सरकार (State Government) महत्वाचे निर्णय घेत आहे. नागरिकांकडून लोकल ट्रेन (Local train) आणि दुकानांच्या (shops) वेळा वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर सरकारने या दोन्ही मागण्या मान्य केल्याने मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com