Mumbai Goa Highway Traffic Jam: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळ वाहतूक कोंडी

मोदी एक्सप्रेस रेल्वेगाडीही दादरमध्ये रखडली
Mumbai Goa Highway
Mumbai Goa Highwaygoogle image
Published on
Updated on

Mumbai Goa Highway Traffic Jam: कोकण आणि गणेशोत्सव हे एक अत्यंत जिव्हाळ्याचे समीकरण आहे. एरवी इतर कुठल्याही सणापेक्षा कोकणातला माणूस गणपती सणासाठी मात्र आवर्जून घरी येत असतो.

त्यामुळेच मुंबईत मोठ्या प्रमाणात असलेल्या कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव काळात कोकणात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारी, खासगी बसेस, जादा रेल्वे याची सोय करण्यात येत असते. यंदाही ती केली गेली आहे.

दरम्यान आज, रविवारी मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण जवळ मोठी वाहतूक कोंडी झाली. चिपळूण येथे नदीच्या पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बराच काळ ही वाहतूक कोंडी येथे होती.

Mumbai Goa Highway
Goa Monsoon 2023: दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता; गोवा वेधशाळेने दिला यलो अलर्ट

सकाळपासूनच बस, खासगी गाड्यांमधून मुंबईतून चाकरमानी कोकणात येत आहेत. चिपळूणच्या वसिष्ठी नदीच्या पुलावर वाहनाच्या दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.

मोदी एक्सप्रेस रखडली

दरम्यान, मुंबई कोकण मोदी एक्सप्रेस रखडली. दीड वाजता सुटणार होती गाडी, पण ती अद्यापही दादर स्टेशनमध्ये उभी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चार तासांपासून या रेल्वेतील प्रवासी ताटकळले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त चाकरमान्यांच्या सोयीसाठी भाजपच्या प्रयत्नातून ही विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले गेले आहे.

दरम्यान, रेल्वेचे वेळापत्रक काही प्रमाणात कोलमडले असून मुंबईतून तळ कोकणात रेल्वेने यायला सुमारे 12 तासांचा कालावधी लागत असल्याचे प्रवासी सांगत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com