महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) पुरवणी परीक्षेचा आज निकाल आज जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा सुमारे 1. 5 लाख उमेदवारांनी दिली आहे.
या परिक्षेचा ऑनलाईन निकाल पुढील तासाभरात लागणार आहे. यंदा 10 वी ची परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान झाली तर 12 वी ची परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. महाराष्ट्र बोर्डाचा पुरवणी निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
कोणत्या अधिकृत वेबसाइट्सवर निकाल पहाल ?
10 वी, 12 वीचे विद्यार्थी पुरवणी निकाल अधिकृत वेबसाइट्स- mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि hsc.mahresults.org.in वर पाहू शकतात. इयत्ता 10 वी, 12 वीचा निकाल व गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा हॉलतिकीट क्रमांक, व नोंदणीकृत जन्मतारीख माहित असणे आवश्यक आहे.
कसा पाहाल 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षा निकाल ?
तुमचा पुरवणी परीक्षा निकाल तुम्हाला समोर दिसेल.
इथेच तुम्हाला पीडीएफ प्रिंट करण्याचा पर्याय सुद्धा दिसेल.
जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेत जवळपास 1. 5 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ष वाया जाऊ नये याकरिता ही परीक्षा घेतली जाते. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३5 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.