Nitin Raut: राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर पुन्हा निर्बंध

राज्यात सप्टेंबरमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा संक्रमण वाढले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनीही लोकांना आव्हान केले आहे की, कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही तरी सर्वानी खबरदारी घ्यावी.
Nitin Raut
Nitin Raut Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्राचे मंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या(Covid-19) तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये सप्टेंबरमध्ये गेल्या 9 दिवसापासून सुमारे 2600 नवीन कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) चिंता वाढली आहे. राज्यातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध कमी केल्याने, कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता चिंतेचे वातावरण झाले आहे.

Nitin Raut
Covid Care Tips: कोविडपासून लवकर बरं होण्यासाठी खास आयुर्वेदिक टिप्स

यावर, महाराष्ट्राचे मंत्री नितीन राऊत म्हणाले की, बऱ्याच काळानंतर नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे लवकरच कोविड आपत्ती व्यवस्थापन दलाची (objection management team) बैठक होणार आहे. त्यामध्ये काही नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात येणार असून यावर लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, नागपूर जिल्ह्यात 17 ऑगस्टपासून निर्बंध हटवण्यात आले होते. कोरोनाची तिसरी लाट आता नागपुरात (Nagpur) पोहोचली आहे.नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आम्ही येथील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर स्थानिक प्रशासन लवकरच कोविड - 19 ची संबंधित निर्बंधांची घोषणा लवकरच घोषणा करतील. विदर्भात ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या झपाट्याने खाली आली होती. आणि या भागात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या ही 3,626 आढळून अली. तथापि, 15 फेब्रुवारीनंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे. परंतु सप्टेंबरमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा संक्रमण वाढले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनीही लोकांना सांगितले आहे की कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही आणि लोकांनी सर्व खबरदारी घ्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com