दहावी आणि बारावी निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीचं काम सुमारे शंभर टक्के पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर 10 जूनपर्यंत बारावीचा तर 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती बोर्डाने दिली. ( Twelfth results will be announced by June 10 and tenth results by June 20 )
शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी काही काळ पेपर तपासणीवर बहिष्काराची भुमिका घेतली होती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाच्या अनुषंगाने संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. यावर आता शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिल्याने हा प्रश्न आता निकाली निघाला आहे.
शिक्षणमंडळाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत निकाल जाहीर केला जाईल," शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डाने म्हटलं. त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.