Bow and Arrow Symbol: निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. याशिवाय, शिंदे गटाच्या गोटात शिवसेनेचे नावही आले आहे. गेल्या वर्षी ठाकरेंविरोधात बंड करुन एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून दोन्ही गटांमध्ये धनुष्यबाण, पक्षाच्या चिन्हावरुन वाद सुरु होता.
शिवसेना पक्षाची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले. यामध्ये मंडळातील सदस्यांना कोणतीही निवडणूक न घेता पदाधिकारी नियुक्त केले जाते. अशा पक्षरचनेमुळे विश्वासाला तडा जातो.
दरम्यान, शिवसेनेच्या (Shiv Sena) मूळ घटनेत अलोकतांत्रिक पद्धती दडल्याचेही आयोगाने मान्य केले. त्यामुळे हा पक्ष एखाद्या खासगी मालमत्तेसारखा झाला आहे. निवडणूक आयोगाने 1999 मध्येच अशा पद्धती नाकारल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेनेवरील ठाकरे गटाचा दावा संपला आहे.
तसेच, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेनेवरील ठाकरे गटाचा दावा संपला आहे. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाने शिंदे गट आणि शिवसेना वादावरील निर्णय 21 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला आहे.
गेल्या महिन्यात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटांनी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदने सादर केली होती.
दुसरीकडे, गेल्या वर्षी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. यादरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दोन तलवारी आणि ढाल हे चिन्ह दिले होते. तर ठाकरे गटाला पेटलेली मशाल हे चिन्ह दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.