नवरात्रोत्सवात बॉम्ब स्फोट घडवण्याचा कट, दहशतवाद्यांच्या चौकशीतून माहिती उघड

महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांचे मॉड्यूल(Terrorists Model) उघडकीस आणले.
Terrorists planned attack during Navratri festival all over the country
Terrorists planned attack during Navratri festival all over the country Dainik Gomantak

या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष कक्षाने महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) आणि मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांचे मॉड्यूल(Terrorists Model) उघडकीस आणले. त्याच पार्शवभूमीवर आज मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari) परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयिताला अटक केल्यानंतर त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई गुन्हे शाखेचे पथक त्याची चौकशी करत आहे. ही चौकशी काही अज्ञात ठिकाणी सुरू झाली असल्याचे समजत आहे. (Terrorists planned attack during Navratri festival all over the country)

पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) ने 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रमाणेच पुन्हा एकदा भारताला हादरवून टाकण्याचा कट रचला होता आणि त्यासाठी त्याने अनेक राज्यांमध्ये स्फोटके पुरवली होती. आयएसआय प्रशिक्षित दोन दहशतवाद्यांसह 6 जणांच्या कथित अटकेनंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाच्या चौकशीत हे उघड झाले आहे.

Terrorists planned attack during Navratri festival all over the country
मुंबईत आणखी एका दहशहतवाद्याला अटक

मोठ्या दहशतवादी हल्ल्याचे नियोजन

हे लक्षात घेण्यासारखे आहे की अटक केलेले दहशतवादी मॉड्यूल आयएसआयच्या सांगण्याप्रमाणे देशातील मोठ्या शहरांमध्ये स्फोट आणि दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होते. हा कट रचण्यासाठी शस्त्रे आणि स्फोटकेही गोळा केली गेली होती. अटक केलेले 2 दहशतवादी डी कंपनीशी संबंधित आहेत. या मॉड्यूलची माहिती गुप्तचर संस्थांकडून मिळाली होती.तपासात उघड झाले की त्यांचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे. त्यानंतर झालेल्या छाप्यात महाराष्ट्रातील एका दहशतवाद्याला कोटा येथून अटक करण्यात आली. याशिवाय 2 जण दिल्लीतून आणि 3 जण यूपी एटीएसच्या मदतीने पकडले गेले आहेत.

दहशतवाद्यांचे रामलीला आणि नवरात्रोत्सव लक्ष्यावर होते

दहशतवाद्यांनी 2 टीम तयार केल्या होत्या. त्यापैकी अनीस इब्राहिम एका संघाचे नेतृत्व करत होता आणि या सगळ्या कारवायांसाठी लागणारे फंडिंगचे नियोजनही त्याच्याकडेच होते. त्याच वेळी, पकडलेला लाला हा अंडर वर्ल्डचा माणूस आहे. भारतातील सणांच्या निमित्ताने देशभरातील स्फोटांसाठी शहरे ओळखणे हे दुसऱ्या टीमचे काम होते. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट करण्याची त्यांची योजना होती.अशी धक्कादायक माहिती चौकशीतून समोर येत आहे.

दहशतवाद्यांचे रामलीला आणि नवरात्रोत्सव लक्ष्यावर होते. स्पेशल सेलचे स्पेशल सीपी नीरज ठाकूर म्हणाले की, आम्ही 6 दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी 2 जण प्रशिक्षण घेतल्यानंतर पाकिस्तानातून परत आले आहेत. यापैकी 2 आधी मस्कतला गेले, नंतर त्यांना तिथे बोटीने पाकिस्तानात नेण्यात आले. त्यांना फार्म हाऊसमध्ये 15 दिवस शस्त्र प्रशिक्षणही देण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com