बैलगाडा शर्यतीसाठी नियमावली जाहीर

मुक प्राण्यांचा छळ थांबणार कधी ?
Guidelines for bullock cart race
Guidelines for bullock cart race Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चैत आलेली बैलगाडा शर्यतीसाठी सर्वाच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत गेल्या निकालावेळी बैलगाडा शर्यतीवरील निर्बंध काहीसे शिथील करत बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली होती. यावर आता न्यायालयाने नियमावली जाहीर करत बैलगाडा शर्यत घेण्यासाठी नेमके काय नियम असतील याबाबत स्पष्टता दिली आहे.(supreme court announces Rules for bullock cart race)

Guidelines for bullock cart race
...तर कदाचित आज तुम्ही मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांना टोला

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी नियमावली जाहीर केल्यानंतर अनामत ठेवीसह परवानगी, छळ-उत्तेजक द्रव्यावर मनाई, एक हजार मीटर अंतर. पंधरा दिवस अगोदर परवानगी घेणे. अनामत रक्कम, बैलाची शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेणे बंधनकारक, शर्यतीसाठी बैलांची छळातून मुक्तता तसेच उत्तेजक द्रव्य-मद्याचा वापर न करणे यासह अनेक कडक नियमांचा

Guidelines for bullock cart race
गोव्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत

सद्या शर्यतीचे केले जाणारे आयोजन हे सर्वोच्च न्यायालय आणि शासनानाच्या परवानगीने करण्यात येत आहे. मात्र या पुर्वी अनेक वेळा प्राणीमित्र, प्राणिमित्र संघटना यांनी बैलगाडी शर्यतीदरम्यान बैलांना दिली जाणारी अमानुष वागणूक याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर सशर्त मिळालेल्या परवानगीने सध्या सर्वत्र यात्रा जत्रांमध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्याची चढाओढ लागली आहे. या आयोजनात नियमावलीचे पालन कितपत केले जाते. यावर पुन्हा विचार करण्याची आवश्यकता आहे.

बैलगाडा शर्यतीसाठीची नियमावली सविस्तररित्या पुढील प्रमाणे

  • शर्यतीदरम्यान बैलावर काठी, चाबूक अथवा तत्सम कोणत्याही प्रकारच्या वस्तूचा वापर करण्यास सक्त मनाई

  • बैलांना कोणतेही उत्तेजक औषधी वा मादक द्रव्य देण्यास मनाई

  • शर्यतीदरम्यान पशु रुग्णवाहिका असणे बंधनकारक

  • शर्यतीचे चित्रीकरण करून उप विभागीय अधिकाऱ्यास सादर करणे बंधनकारक

  • वरील कोणत्याही अटीचा भंग झाल्यास अनामत रक्कम जप्तीसह कारवाई

  • बैलाच्या वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र आवश्यक

  • स्पर्धेतील सहभागी बैलाचे छायाचित्र बंधनकारक

  • ठरलेल्या गाडीवानास ओळखपत्र बंधनकारक

  • ठरलेल्या गाडीवानालाच सहभागी होण्याची परवानगी

  • शर्यतीसाठी फक्त एक हजार मीटर अंतराची अट बंधनकारक

  • शर्यतीसाठी योग्य धावपट्टी आवश्यक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com