कर्मचाऱ्यांच्या (Staff) संपामुळे एसटी सेवांच चाक अजून रुळावरती आलं नाही, आणि त्यामुळेच 11 हजार कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. 11 हजार कंत्राटी चालकांच कंत्राट खाजगी कंपनीला दिला जाणार आहे आणि त्यासाठी येत्या आठवड्यांमध्ये निवीदा काढल्या जातील. (The ST Corporation has decided to hire 11,000 contract drivers)
त्यानंतर 15 ते 20 दिवसांतच टप्प्याटप्यांन कंत्राटी चालकांची भरती करणार असल्याचेही समोर आले आहे. एसटी महामंडळातील (ST Corporation) एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 81683 असुन त्यातील 31234 कर्मचारीच कामावरती आहेत.
या संपामुळे कर्मचाऱ्यांच्या एकजुटीवर जरूर शिक्कामोर्तब झाला आहे आणि वेतनाविना सोसावे लागणारे अपरंपार हाल सहन करूनही हे कर्मचारी कामावर यायला तयार का नसावेत? असाही प्रश्न उभा राहिला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न रास्तच होता. सरकारने त्यात लक्ष घालून त्यासंबंधीचा निर्णयदेखील घेतला आहे.
सर्वात तळाच्या पातळीवरील कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीमुळे किमान चार-साडेचार हजारांची वाढ मिळाली आहे. शिवाय, इथून पुढे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होईल, त्यासोबतच अन्य सुविधा देण्याचेही सरकारने जाहीर केले होते. त्यानंतरही प्रवाशांच्या अडचणींचा विचार न करता बरेच कर्मचारी ‘संप’ नि ‘काम बंद’च्या कुंपणातून बाहेर येऊ इच्छित नसल्याचे चित्र पाहायला भेटत आहे.
सरकार तसेच महामंडळ यांनीही यानिमित्ताने केवळ कर्मचाऱ्यांच्या मागणीपुरता संकुचित विचार न करता त्यापलीकडे जाऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करायला हवा, तरच ‘गाव तेथे रस्ता; रस्ता तेथे एसटी!’ हे घोषवाक्य सार्थ ठरणार आहे. अन्यथा, या लोकोपयोगी सेवेचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागणार नाहीये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.