नवी मुंबईत यापुर्वी ही बऱ्याचदा इमारती कोसळल्याने अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला होता. यावर कोगदी घोडे नाचवत प्रशासनाने ही कारवाईच्या घोषणा केल्या होत्या. मात्र हा प्रश्न अद्याप जैसे थे च असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कारण नेरुळ सेक्टर 17 येथील जिमी पार्क सोसायटीमधील स्लॅब कोसळल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे.
सहाव्या मजल्यावरील रुममध्ये लादी बसवण्याचे काम सुरु होते. हॅालमध्ये काम सुरू असतानाच सहाव्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला. व वरुन पडलेल्या स्लॅब च्या वजनाने खालच्या माळ्यापर्यंत संपूर्ण हॅालचा भाग कोसळला. सुदैवाने यात अद्याप जीवितहानी झाल्याचं समोर आले नसले तरी नागरिकांच्या जीवाचा खेळ संपणार आहे की नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.कारण 30 वर्षेही पूर्ण न झालेल्या इमारतींचा भाग पडल्याने बांधकामाबाबत शंका उपस्थितीत होत आहे. यामध्ये अडकलेल्या 15 जणांना वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.
यात सहा जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सहा मजल्यावरुन खालचे सगळे स्लॅब पडल्याने खिडकीत अडकून बसलेल्यांना ग्रील कापून बाहेर काढण्यात आले. ही इमारत 1994 साली बांधलेली आहे. या बिल्डरने मुंबई शहरात अजून किती ठिकाणी बांधकाम केले आहे.
याची चौकशी करुन स्ट्रक्चरल ॲाडिट केलं जाणार आहे. दरम्यान पावसाळ्यात घरातील कामे काढून इमारतीला धोका पोचविणार्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. मात्र या घटनेमुळे मुंबईतील नागरिक राहत्या घरी ही सुरक्षित आहेत का ? यावर पुन्हा विचार होण्याची आवश्यकता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.