सिंधुदुर्गची गोव्याच्या पर्यटन विश्‍वाशी स्पर्धा

गोव्यातील पर्यटन सिंधुदुर्गापर्यंत यावे हा महाराष्‍ट्राचा ‘हिडन अजेंडा’
Sindhudurg competes with Goa tourism
Sindhudurg competes with Goa tourism Dainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदुर्ग: गोव्‍याच्‍या (Goa Border) सीमेवरील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्‍ह्यातील चिपी (वेंगुर्ले) विमानतळावर (Chipi Airport) पहिले विमान उतरले आणि तेथील पर्यटन विस्ताराचे स्वप्न आणखी ठळक झाले. हवाई नकाशावर सिंधुदुर्गाचे नाव कोरल्यामुळे आता विदेशी पर्यटक येथे येण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाने गोव्याच्या पर्यटन विश्‍वाशी स्पर्धा करण्यासाठीचे पाऊल टाकले. अर्थात सिंधुदुर्गाच्या पर्यटन विस्तारासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र आणि लवचिक धोरण अवलंबले तरच गोव्याशी स्पर्धा करणे शक्य होणार आहे. यातही गोव्याला सिंधुदुर्ग पर्याय म्हणून उभा करायचा की तेथील पर्यटनच इथपर्यंत विस्तारायचे याचाही पर्यटन धोरणात विचार व्हायला हवा. त्यावरच पुढच्या प्रवासाची दिशा ठरणार आहे.

Sindhudurg competes with Goa tourism
गोव्‍याच्‍या पर्यटनाला ‘चिपी’चे आव्‍हान‍!

सिंधुदुर्ग गोव्याला जितका जवळ तितकाच इथला निसर्ग, लोकजीवन यात साधर्म्य आहे. अगदी संस्थान काळातही गोव्याचा बराचसा भाग तत्कालीन सावंतवाडी संस्थानच्या अधिपत्याखाली होता. यामुळे नातीगोती, परंपरा याचेही ऋणानुबंध या दोन प्रांतांशी जोडलेले आहेत. असे असूनही गोवा पर्यटनाबाबत खूप आधीपासून जगाच्या नकाशावर पोहोचला; पण लगतच्या सिंधुदुर्गात पर्यटनातला ‘प’ पण पोहोचला नाही. याचे मुख्य कारण होते पायाभूत सुविधांचा अभाव आणि सरकारी धोरणातली तफावत. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केल्यापासून ते काल झालेल्या चिपी विमातळाच्या उद्घाटनापर्यंतचा प्रवास हा याच त्रुटी दुरूस्त करण्याचा प्रयत्न म्हणता येईल.

महाराष्‍ट्राचा ‘हिडन अजेंडा’

90च्या दशकात सिंधुदुर्गात पर्यटन विकासाचे वारे वाहायला लागले. टाटा कन्सल्टन्सीकडून महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्गाच्या पर्यटन विकासाचा एक अहवाल बनवून घेतला. नंतर सिंधुदुर्ग देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला. पायाभूत सुविधांवर काम सुरू झाले. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने तारकर्ली, आंबोली आदी पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे करत असताना गोव्यातील पर्यटन सिंधुदुर्गापर्यंत यावे हा ‘हिडन अजेंडा’ कायमच राहिला.

Sindhudurg competes with Goa tourism
गोवा पर्यटन व्यावसायिकांना आतापासूनच 'चिपी'ची धास्ती

अन्‌ दिसू लागला पर्यटनाचा मार्ग

मध्यमवर्गीय पर्यटक सिंधुदुर्गात स्थिरावू लागले. यातून मालवण, वेंगुर्ले, आंबोली आदी स्थळांवर पर्यटन विस्तार दिसू लागला. अर्थात धोरणातील लवचिकतेचा अभाव, प्रयत्नांमधील सातत्याचा अभाव, स्थानिक मानसिकता, वाहतूक व्यवस्थेतील दोष, पायाभूत सुविधांची कमतरता, स्थानिकांना पर्यटनात आणण्यासाठी बळ देण्यात आलेले अपयश आदी कारणामुळे हा पर्यटन विकास मर्यादितच राहिला. गोव्यातील पर्यटन अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या परदेशी पर्यटकांना येथे आकर्षित करण्यात सिंधुदुर्ग कमी पडला. आता हा जिल्हा स्वतंत्रपणे हवाई नकाशावर आल्याने या परदेशी पर्यटन विश्‍वात सिंधुदुर्गाला आपले नाव कोरण्याचा मार्ग दिसू लागला आहे. मुळात सिंधुदुर्ग हवाई वाहतुकीसाठी गोव्याच्या दाबोळी विमानतळावर अवलंबून होता. चिपीमुळे हे अवलंबत्व बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे गोव्यात येण्यासाठी सिंधुदुर्ग हे एक वेगळ पॅकेज ठरेल आणि सिंधुदुर्गाला गोवामार्गे पर्यटनाचा राजमार्ग मिळू शकेल.

-शिवप्रसाद देसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com