'भाजप देशात सर्वत्रच दिसतोय मात्र... ' शिवसेनेचा भाजपवर टीकेचा बाण

शिवसेनेने (Shivsena) काश्मीर मुद्दा,लखीमपूर खेरी या साऱ्या घटनांवरून आपल्या अग्रलेखातून टीकेचे बाण सोडले आहेत .
Shivsena slams on BJP Jammu Kashmir Lakhimpur Kheri issue
Shivsena slams on BJP Jammu Kashmir Lakhimpur Kheri issueDainik Gomantak

सध्या भाजप (BJP) देशात सर्वत्र दिसतोय. फक्त कश्मीर (Jammu Kashmir) खोऱयांत निरपराध्यांच्या हत्या सुरू असताना केंद्र सरकार (Central Government) आणि भाजपचे अस्तित्व कुठंच दिसत नाही. भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पाटर्य़ांत दिसते ईडीच्या (ED) कारवाईत ते दिसतात, आयटीत दिसतात तसे ते कश्मीर खोऱयातही दिसावे. एवढेच नव्हे, तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शांत’ करण्यासाठी ‘खासगी आर्मी’ उभारावी असे जाहीर सल्लेही भाजपचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना देतात, असं म्हणत शिवसेनेने (Shivsena) भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. (Shivsena slams on BJP Jammu Kashmir Lakhimpur Kheri issue)

कश्मीर खोऱ्यात सध्या दहशतवाद्यांकडून निरपराध पंडित आणि शिखांच्या हत्या केल्या जात आहेत.तिथे सतत अल्पसंख्यकांना लक्ष केले जात आहे तेव्हा या धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून कश्मीरातही जावे. त्यांची वाहव्वाच होईल, असंही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपला पुन्हा एकदा लक्ष केले आहे.

सामना या आपल्या मुखपत्रातून शिवसेना सतत भाजपवर शरसंधान साधताना दिसते. आणि आज पुन्हा एकदा काश्मीर मुद्दा,लखीमपूर खेरी या साऱ्या घटनांवरून आपल्या अग्रलेखातून टीकेचे बाण सोडले आहेत .

Shivsena slams on BJP Jammu Kashmir Lakhimpur Kheri issue
शिवसेनेतील हप्तेखोरांची नावे जाहीर करावीच...

त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, प्रवक्ते आणि भक्त सर्वत्रच दिसतात मात्र ते कश्मीर खोऱयात दिसत नाहीत. कश्मीर खोऱयात गेल्या चार दिवसांत अनेक हत्या झाल्या आहेत . सात नागरिकांना अतिरेक्यांनी दिवसाढवळय़ा ठार केले. दहशतवादी गावात घुसतात, ओळखपत्रे तपासून हिंदू किंवा शिखांना ठार करतात अल्पसंख्याकांना टार्गेट करतात असे हत्यासत्रच सध्या कश्मीरमध्ये सुरू फक्त कश्मिरी पंडित, हिंदू, शीखच नाहीत, तर पोलीस खात्यात कर्तव्य बजावणाऱया मुस्लिम अधिकाऱयांनाही अतिरेक्यांकडून लक्ष्य केले जात आहे. कश्मीर पुन्हा हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर उभे आहे.

या शब्दात सामनामधून भाजपला लक्ष केले गेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com