सिंधुदुर्ग येथील ओसरगाव टोलनाक्यावर शिवसेनेचं आंदोलन

''सिंधुदुर्गवासियांना जोपर्यंत टोल माफी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच''
Osargaon Toll Plaza
Osargaon Toll PlazaDainik Gomantak

मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कोकणातील दोन टोल नाक्यावर टोल वसुलीची सुरु होणार असल्याचे म्हटले होतं. यामूळे कणकवली ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली सुरु होणार होती. यामूळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय वातावरण गेले दोन दिवस चांगलेच तापले आहे. टोल वसुलीच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच आता शिवसेनेने टोल वसुलीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगिती दिल्यानंतर सुध्दा आज शिवसेनेने टोलनाक्यावर आंदोलन केलं. (ShivSena agitation on Osargaon toll plaza in Sindhudurg)

पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यावेळी म्हणाले कि, सिंधुदुर्गवासियांना जोपर्यंत टोल माफी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचं अजूनही बरंच काम बाकी आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करु नये. महामार्गाला ज्या लोकांच्या जमिनी अधिग्रहित केल्या त्यांना मोबदला दिला पाहिजे अन्यथा शिवसेना उग्र आंदोलन छेडल्याखेरीज राहणार नाही असं ही ते म्हणाले.

Osargaon Toll Plaza
इच्छा पूर्ण करण्याच्या बहाण्याने बनावट तांत्रिकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

टोल वसुली स्थगितीनंतर सुध्दा आज शिवसेनेने टोलनाक्यावर आंदोलन केलं. या आंदोलनात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार वैभव नाईक, शिवसनेचे नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्ते यावेळी ओसरगाव टोलनाक्यावर उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा करण्यात आली.

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार वैभव नाईक म्हणाले कि, हा महामार्ग केंद्राच्या अखत्यारित असून महामार्गाचं काम सुरु असताना ठेकेदाराला कोणी पाठिशी घातलं हे जनतेला माहित आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रस्त्यांसंदर्भात किती बैठका घेतल्या, महामार्गाच्या जमिनी गेल्या त्यासंदर्भात काय भूमिका घेतली. केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणेंनी या टोल संदर्भात आपली भूमिका जाहीर करावी, असं ते म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com