'आयएनएस विक्रांतचा घोटाळा बोफोर्सपेक्षा मोठा'

शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. परंतु आता शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आणखी शिगेला पोहोचला आहे. आज दिवसभरात राजकीय विश्वात मोठ्या घडामोडी घडल्या . राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वाढत्या कारवायांवर पवारांनी पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधले असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी म्हटले आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut criticized Kirit Somaiya)

संजय राऊत म्हणाले, इमोशनल ब्लॅकमेल करत किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून पैसे लाटले आहेत. आयएनएस विक्रांतचा घोटाळा हा बोफर्स घोटाळ्यापेक्षा जास्त मोठा आहे. माझ्यासारख्या माणसाला संसदेत बोलू दिले जात नाही. परंतु आज शरद पवारांनी राष्ट्रहीताची भूमिका पंतप्रधानांसमोर मांडली आहे. देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा आध्याय सुरु झाला आहे. माझ्यावरील कारवाईनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत.

Sanjay Raut
संजय राऊतांच्या संपत्तीला ईडीचं कुलूप

किरीट सैमय्या म्हणाले होते की, ''शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत यांच्या अलिबागमधील जमीन, प्रॉपर्टी आणि दादरमधील प्लॅट ईडीने जप्त केला आहे. संजय राऊतांना यासंबंधीची माहिती असल्यामुळे त्यांनी ईडीला 55 लाख परत केले होते. परंतु ते आमच्यावर ज्यापध्दतीने आरोप करत आहेत, यावरुन त्यांची मानसिक स्थिती आम्ही समजू शकतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com