भीमा - कोरेगाव प्रकरणी शरद पवारांची तिसऱ्यांदा नोंदवली साक्ष

जे एन पटेल आयोगाने नोंदवली साक्ष
sharad pwar
sharad pwarDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज साक्ष नोंदवली. या प्रकरणी शरद पवारांना तिसरं समन्स मिळालं होत. आज मुंबईत सुनावणी झाली. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे.एन.पटेल आयोगासमोर शरद पवार यांनी साक्ष दिली आहे. यावेळी शरद पवारांनी दहा प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

( Sharad Pawar's testimony recorded for third time in Koregaon Bhima case)

sharad pwar
अल्टिमेटम द्यायला हे तुमचं घर नाही - अजित पवार

दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जे एन पटेल आयोगाने साक्ष नोंदवली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या जे एन पटेल आयोगाने तिसऱ्यांदा शरद पवार यांना ५ आणि ६ मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. त्यांनी आयोगासमोर साक्ष दिली आहे. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. काही दिवसांपूर्वी पवारांनी या प्रकऱणी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. २३ आणि २४ फेब्रुवारीला त्यांना साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहता आलं नव्हतं. त्याची साक्ष पवारांनी आज आयोगासमोर नोंदवली.

sharad pwar
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एक ठार

भीमा कोरेगाव प्रकरण नेमकं काय ?

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात भिडे यांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ४१ आरोपीं विरोधात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यात भिडे यांचं नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून मानवी हक्क आयोगापुढे झालेल्या सुनावणी दरम्यान नुकतीच देण्यात आली.

संभाजी भिडे यांचा हिंसाचार प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचं आढळून आल्याचं पोलिसांनी मानवी हक्क आयोगापुढे सांगितलं. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटात हिंसाचार झाला होता. या प्रकरणात संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com