Sanjay Raut on Kashmir Files: 'काश्मीर फाईल्स' भाजपचाच, राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Comment on the kashmir files: शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत भाजपवर थेट निशाणा साधला आहे.
Sanjay Raut on Kashmir Files
Sanjay Raut on Kashmir FilesDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील (Goa) इफ्फी या चित्रपट महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी महोत्सवाचे परिक्षक नदाव लॅपिड यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'काश्मीर फाईल्स' वर वादग्रस्त निधान केले आहे. त्यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली आहे.यावर अनेक सिनेकलाकारांसह राजकिय नेत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहे.

लॅपिड यांच्या वक्तव्याचे सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच पडसाद उमटले आहे. त्यावर आतापर्यत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, चित्रपटाचे निर्माते अनिल पंडित, प्रमुख कलाकार अनुमप खेर यांनी ट्विट करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काश्मीर फाईल्स हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणारा मुद्दा आहे. या चित्रपटाने सर्वाधिक चर्चेत राहण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.

Sanjay Raut on Kashmir Files
The Kashmir Files in IFFI 2022: 'द काश्मीर फाईल्स' वरील 'त्या' टिप्पणीचा सिनेकलाकारांकडून पुरता समाचार, म्हणाले....

शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या शैलीत भाजपवर थेट निशाणा साधला आहे. समाज माध्यमाशी बोलतांना ते म्हणाले, लॅपिड जे म्हणाले ते काही खोटे नाही. तो तसाच चित्रपट आहे जो लॅपिड यांना अपेक्षित आहे. काश्मीर फाईल्स हा भाजपचा प्रचार करणारा चित्रपट आहे. त्याच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मी जेव्हा दुसरा पार्ट तयार कराल का असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही.

काश्मीर फाईल्सने कोट्यवधींची कमाई केली, पण त्या पैशांतून किती काश्मिरी पंडितांना मदत केली हे सांगावे. एका पक्षाचा प्रचार आणि एका पक्षाविरोधात प्रचार केला गेला आहे. एका पक्षाने खूप गाजावाजा केला आहे. त्यानंतर काश्मिरी पंडितांवर खूप अत्याचार झाले. असेही राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती सारखे दिग्गज कलाकार आहेतच पण त्याचबरोबर पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार सारखे अनुभवी कलाकार देखील आहेत. चित्रपटाचा विषय, दिग्दर्शक आणि कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि चित्रीकरणादरम्यान आलेल्या अडचणी या सर्व गोष्टी लक्षात घेता देशातील अनेक राज्यांमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. त्याचपाठोपाठ आता गोव्यातही (Goa) 'द काश्मीर फाईल्स' चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com