'जे इतिहास घडवू शकत नाहीत, ते इतिहास नष्ट करतात': संजय राऊत यांचा सरकारवर घणाघात

पंडित नेहरूंचा (Pandit Jawaharlal Nehru) तिरस्कार का? असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे.
Sanjay Raut attacks on Modi government for removing Nehru's photo from ICHR poster
Sanjay Raut attacks on Modi government for removing Nehru's photo from ICHR posterDainik Gomantak
Published on
Updated on

मोदी सरकार (Modi Government) आणि भाजपची (BJP) लढाई राहुल गांधी(Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi), सोनिया गांधी (Saniya Gandhi) यांच्याशी आहे हे समजू शकतो कारण विरोधक एकमेकांवर टीका करतात तो त्यांचा अधिकारच असतो मात्र पंडित नेहरूंचा (Pundit Jawaharlal Nehru) तिरस्कार का? असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे. आजच्या 'सामना'मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या रोकठोक या लेखात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. (Sanjay Raut attacks on Modi government for removing Nehru's photo from ICHR poster)

Sanjay Raut attacks on Modi government for removing Nehru's photo from ICHR poster
कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांनी सज्ज रहावे: मुख्यमंत्री ठाकरे

भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव सुरू होत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च (ICHR) या भारताच्या इतिहासावर संशोधन करणाऱ्या संस्थेने जवाहरलाल नेहरूंचे चित्र 'आझादी का अमृत महोत्सवा'शी संबंधित पोस्टरमधून काढून टाकले. संजय राऊत यांनी यावरही खोचक टीका केली आहे.

“आझादी का अमृत महोत्सवाच्या पोस्टरमधून पंडित नेहरूंचे चित्र काढण्यात आले आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, पं. मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यसेनानी वीर विनायक दामोदर सावरकर यांची चित्रे प्रमुख आहेत, पण पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांचे फोटो नाहीत. नेहरू-आझाद यांना हटवून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण विशेषतः नेहरूंना हटवून सध्याच्या सरकारने आपले संकुचित मन दाखवले आहे. स्वातंत्र्य संग्रामाचे नायक पंडित नेहरू यांना स्वातंत्र्य लढ्यातून असे लोक काढून टाकले जात आहेत ज्यांचे इतिहास घडवण्यात कोणतेही योगदान नव्हते आणि जे स्वातंत्र्य संग्रामापासून दूर होते. हे बरोबर नाही. "असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार शरसंधान साधले आहे.

Sanjay Raut attacks on Modi government for removing Nehru's photo from ICHR poster
Maharashtra: कोल्हापूरसह सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

त्याचबरोबर "पंडित नेहरू आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाबद्दल मतभेद असू शकतात. नेहरूंचे राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय धोरण कोणीही स्वीकारू शकत नाही, परंतु राजकीय पक्षपातीपणामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेहरूंचे योगदान मिटवणे हा स्वातंत्र्य संग्रामातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे."अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

आझादी का अमृत महोत्सव' च्या पोस्टरमध्ये महात्मा गांधी, त्यांचे अनुयायी राजेंद्र प्रसाद आणि सरदार पटेल यांचे चित्र आहे, परंतु नेहरूंना पोस्टरमधून काढून टाकण्यात आले आहे. यावर टीका करताना संजय राऊत यांनी"नेहरू गांधींचे मवाळ अनुयायी होते. नेहरूंना काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या महान लढ्यातील शेवटचा प्रमुख नेता म्हणून मान्यता द्यावी लागेल."असे मतही त्यांनी या लेखात णदले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com