Rohit Sharma: क्रिकेट फॅन्ससाठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी 'मुंबईच्या राजा'ची शिवाजी पार्कवर 'पॉवर हिटिंग' Watch Video

Rohit Sharma Mumbai practice video: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.
Rohit Sharma Mumbai practice video
Rohit Sharma Mumbai practice videoDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma practice session before Australia tour at Shivaji Park Mumbai

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाला दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. टीममध्ये सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आला असून दोघेही एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा मुंबईत सराव करताना दिसला. त्यांनी स्थानिक मैदानावर भरपूर घाम गाळत फलंदाजी केली. नेट सरावादरम्यान रोहितने बचावात्मक तसेच आक्रमक शॉट्सवर काम केले. सिंगल्स, गॅप शॉट्स तसेच लांब फटके मारताना त्याचा उत्साह स्पष्ट दिसत होता. मुंबईच्या शिवाजी पार्कवरून टिपलेला रोहितचा सराव व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Rohit Sharma Mumbai practice video
Goa Drug Bust : शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

यादरम्यान, एकंदिवसीय मालिकेत रोहित जवळजवळ सात महिन्यांनंतर टीम इंडियासाठी पुनरागमन करणार आहे. रोहितने यापूर्वी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.

बऱ्याच काळानंतर, रोहित शर्मा या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधार नसून खेळाडू म्हणून सामील होणार आहे. रोहितच्या जागी शुभमन गिलला कर्णधारपद दिले गेले आहे. भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर रोहितला टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली होती.

त्यानंतर २०२५ च्या आयपीएल दरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमधूनही ब्रेक घेतला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला कर्णधारपदावरून काढण्यात आले आहे, परंतु त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला खेळाडू म्हणून मिळेल अशी अपेक्षा आहे.

Rohit Sharma Mumbai practice video
Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

विशेष म्हणजे, रोहित शर्मा पुन्हा एकदा भारतीय संघाकडून फलंदाजी करताना दिसणार आहे. त्याच्या अनुभवामुळे युवा फलंदाजांनाही मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. रोहितच्या नेट सरावाचे व्हिडिओ पाहून चाहत्यांमध्ये उत्साह आणि आशा निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com