Monsoon Return Journey: कोल्हापूर, सिंधूदुर्गात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडेत झाड कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी
Monsoon Return Journey
Monsoon Return JourneyDainik Gomantak
Published on
Updated on

कोल्हापूर आणि सिंधूदुर्ग येथे परतीच्या पावसाने आज जोरदार हजेरी लावली. आज दुपारी वादळी वारे आणि मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. सोयाबिन, भात या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

Monsoon Return Journey
Chhagan Bhujbal News: NCP चे नेते छगन भुजबळ यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कोल्हापूरमध्ये झालेल्या वादळी पावसाचा शेतीसह अनेक ठिकाणी परिणाम दिसून आला. पावसामुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडली. उजळाईवाडी ते शाहू जकात नाका ते टेंबलाई उड्डाण पूल, शिवाजी विद्यापीठ परिसर आणि शाहू मिल चौकात झाडे उन्मळून पडली. झाडे पडल्याने काही ठिकाणी वाहतूकीवर परिणाम झाला. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडेत झाड कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक खोळंबली.

Monsoon Return Journey
Pune News: 'पुणे तिथे काय उणे' ट्रॅफिकमुळे चक्क मर्सिडीज बेंझच्या सीईओंनी केली ऑटो सवारी, पहा फोटो

सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यात देखील आज दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला. अचानक आलेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे कापणीला आलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com