उत्तर कोकणातील शिवसेना कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अनिल परब यांना हटवण्याची मागणी केली आहे. ही मागणी उत्तर रत्नागिरी अर्थात खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण या ठिकाणच्या शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केली आहे. शिवसेना कार्यत्यांऐवजी इतर पक्षांच्या कार्यत्यांना झुकते माफ देत असल्याचा आरोप परब यांच्यावर शिवसेना कार्यत्यांनी केला आहे. (Remove Minister Anil Parab: ShivSena activists )
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात अर्थात रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस आता पुढे आली आहे.कारण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे कि, पालकमंत्री अनिल परब यांना केवळ झेंडावंदनला येण्यास वेळ आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना झुकते माप देतात. निधी वाटपामध्ये देखील डावललं जातं त्यामूळे शिवसेनेचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी सामंत यांनी कशा पद्धतीने चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात लोकसभेवेळी असलेलं 50 हजारांचं मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांनी तोडलं होतं. त्याबाबचा किस्सा सांगितला होता. तो व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यामुळे सामंत यांच्याबाबत देखील नाराजी व्यक्त केली गेली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.