रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी कंपनीत पुन्हा एकदा अग्नितांडव

कंपनीमध्ये सहा ते सात स्फोट होऊन येथे भीषण आग लागली.
Fire
Fire Dainik Gomantak
Published on
Updated on

रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटांनी हादरली आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसी येथील प्लॉट नंबर 39 येथील प्रिवी ऑर्गानिक्स लिमिटेड कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. कंपनीमध्ये सहा ते सात स्फोट होऊन येथे भीषण आग लागली.(Fire caught in Lote MIDC company)

ही आग इतकी मोठी होती की, तब्बल दहा किलोमीटर लांबून आगीच्या धुराचे लोट दिसून येत होते. यामुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण या दुर्घटनेमध्ये कोणीतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. कंपनीतील सॉल्व्हंट केमिकलच्या ड्रम ठेवलेल्या विभागांमध्ये आग लागून हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कंपनीच्या शेजारीच सीएनजी गॅस कंपनी असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

Fire
भाजप आमदाराच्या वाढल्या अडचणी, महिलेला जीवे मारण्याचं प्रकरणं आलं अंगलट

आगीची माहिती मिळताच खेड, चिपळूण तालुक्यातील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आता नियंत्रणात आणली आहे. ही आग चार तासांनंतर नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले आहे. लोटे एमआयडीसीमध्ये अपघातांचे आणि स्फोटांचे प्रमाण वाढत असून गेल्या वर्षभरात सहाहून अधिक मोठे स्फोट झाले आहेत. यामुळे सतत होणाऱ्या या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com