Raigad landslide: रायगडवर आभाळ फाटलं; दरड कोसळून ३६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

रायगड मध्ये तळई गावात झालेल्या दरड दुर्घटनेमध्ये ३२जणांचा मृत्यू झालाआहे
Image for representational purpose
Image for representational purposeUnsplash
Published on
Updated on

रायगड (Raigad) जिल्ह्यात महाडजवळ तळई गावात दरड (landslide) कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (Raigad: 32 killed in landslide amid heavy rains)

मुसळधार पाऊस तसेच ढगफुटी सदृश्यस्थितीमुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेली दरड कोसळली आहे. दरड कोसळून यामध्ये जावपास ३५ घरांचं नुकसान झालं असून असून त्याखाली ८०-८५ जण गाडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरड कोसळल्यानंतर या गावामध्ये 400 ते 500 लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या ७ दिवसापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विसकळीत झाले आहे.

तळई हे गाव महाड तालुक्यात एका डोंगर कपारीमध्ये स्थित आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे गेल्याची भीती देखील वर्तवली जात आहे. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत असल्याने मदतकार्याला वेळ लागत आहे. या गावात जाणाऱ्या रस्त्यांवर काल ८-९ फुटांपर्यंत पाणी जमले होते.

मुख्यमंमंत्र्यांडून आढावा

महाड येथील पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली आहे. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com