पुण्यात उभारले चक्क नरेंद्र मोदींचे मंदिर

"या मंदिरावरून ट्रोल केलं गेलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याकरिता हे मंदीर उभारले" (PM Modi Temple In Maharashtra)
Pune youngster build temple of PM Narendra Modi
Pune youngster build temple of PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

2014 मध्ये केंद्रात मोदींच सरकार (Narendra Modi Government) आलं आणि आपण त्यानंतर अनेकदा मोदी भक्त हा शब्द एकात आलो आहोत . देशात आणि विदेशात मोदींचे लाखो चाहते आहेत आणि हे चाहते आपल्या नेत्यासाठी काहीही करू शकतात हे सांगायची गरज नाहीये. पण पुणे (Pune) तिथे काय उणे असे म्हणटले जाते याचाच प्रत्यय पुण्यात मोदींच्या चाहत्यांमुळे पुन्हा एकदा आला आहे.कारण पुण्यामध्ये एका मोदीभक्ताने चक्क पंतप्रधान मोदींना (Prime Minister Narendra Modi) देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे (Modi's Temple in Maharashtra), पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने मोदींचे मंदिर उभा केले आहे. स्वतःची मालकी असलेल्या, जागेत त्यांनी हे मंदिर उभारले आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी या मंदिराचे उदघाटनही झाले आहे. (Pune youngster build temple of PM Narendra Modi)

यावेळी बोलताना या भक्ताने समर्पक असे उत्तर देखील दिले आहे. "या मंदिरावरून ट्रोल केलं गेलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याकरिता हे मंदीर उभारले" असल्याचे सांगत मयूर मुंढे या युवकाने मोदींच्या प्रति आपली भावना व्यक्त केली आहे . आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी त्याच्या कवितेच्या आधारे ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Pune youngster build temple of PM Narendra Modi
महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाची शक्यता: हवामान विभाग

या अगोदरही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या चाहत्यांनी देवाची उपमा दिलीच आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही मोदीस्तुती करणारे एक ट्विट केले होते , “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार आहेत. ते देवासमान आहेत. ते देशाची सेवा करत आहे.” सांगत अनेकांची नाराजी मात्र त्यांनी ओढवून घेतली होती.

मात्र सध्या देशात आणि देशाबाहेरही मोदींची क्रेज ही जास्तीची आहे. अनेकजण आपल्या नेत्यावर त्यात्या परीने आपल्या भावना आपले प्रेम व्यक्त करत असतात आणि आता पुण्यातील या युवकाने मोदींबद्दलची आपली श्रद्धाच व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com