Mumbai Trans-Harbour Link Bridge: ट्रान्स हार्बरमुळे पुणे अन् गोवा येणार मुंबईच्या आणखी जवळ

शिवडी ते न्हावा शेवा, असा ओळखला जाणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) ची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
MTHL
MTHLDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Trans-Harbour Link Bridge:  मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मेन लँडशी प्रत्यक्ष जोडणी करण्यात आली.

हा पुल पुढे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे. या पूलामुळे पुणे आणि गोवा मुंबईच्या आणखी जवळ येईल.

दरम्यान,प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा ठरणार आहे. हा पुल पुढे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे.

हा प्रकल्प तिसऱ्या मुंबईची सामाजिक-आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला आहे.

हा समुद्री पूल अभियांत्रिकीचा चमत्कार समजला जाईल. या पुलामुळे अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग या समुद्री पुलावरुन वरून जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

एक्स्प्रेसवेला जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक मार्ग 735 किलोमीटरचा आहे. त्याचा खर्च तब्बल 1 हजार 352 कोटी इतका आहेत. तर, या मार्गावर 3-3 लेन आहेत. कॉरिडॉरमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूककोंडीची समस्या सुटणार आहे.

तसेच, मुंबईतून अवघ्या 90 मिनिटांत पुणे गाठता येणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्ग राष्ट्रीय महामार्ग 348 येथील चिरले येथे संपतो. NH-348 येथे मोठे ट्रक आणि कंटेनरमुळे नेहमीच वाहतूक कोंडी असते.

तसंच. जेएनपीटी पोर्टमुळे ही वाहतुकीची समस्या कायम असते. म्हणून NH-348ला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जोडण्यात येत आहे. मुंबई ट्रान्स हार्बरलिंक येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर या मार्गावरुन दररोज ७० हजार गाड्या धावू शकणार आहेत.

दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुलावर एमएमआरडीए अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बेस्टच्या खुल्या डेकवर प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला.

डेक स्लॅबचे काम पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर लेक्सस कारमध्ये शिंदे आणि फडणवीसांनी कारमधून टेस्ट ड्राइव्ह केले.

फडणवीस यांनी स्टेअरिंग घेतले तर शिंदे त्यांच्या शेजारी बसले होते. त्यांनी नवी मुंबईच्या दिशेने 10 किमी गाडी चालवली. त्यांनी 40 मिनिटांत जवळपास 14 किमी प्रवास केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com