Pandharpur Suicide Case: आपला देश कृषिप्रधान देश जरी असला तरीदेखील देशात मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. अद्याप हे सत्र सुरूच आहे. दिल्लीत शेतकारीविरोधी कायद्याचा लढा सुरू असताना तर अनेक शेतकऱ्यांनी या कायद्याचा निषेध करण्यासाठी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. याच संदर्भातील एक घटना देवभूमी पंढरपूरमध्ये घडली आहे. फेसबुक लाईव्ह सुरु असताना एका शेतकऱ्याने (Farmer) विषप्राशन करुन आत्महत्या केली आहे. राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी पंढरपूरमधील (Pandharpur) मगरवाडीमधील सूरज जाधव या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. शुक्रवारी सूरजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Protesting against the government pandharpur farmer committed suicide on Facebook Live)
कीटकनाशक पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये सूरज पुन्हा जन्म मिळालाच तर शेतकरी म्हणून मिळू नये, असे सांगताना आहे. 'माझं आयुष्य इतकच होतं. मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाही, कारण शेतकरी हा असमर्थ, दुबळा असतो', त्याने या व्हिडीओमध्ये कीटकनाशकाची बाटली उघडली आणि तोंडाला लावली. त्यापूर्वी त्याने सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही असेही म्हटले. या प्रकारानंतर त्याला पंढरपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.