Maha Tourism: सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील सागरी पर्यटनाच्या जाहिरातीचा प्रस्ताव, तारकर्लीत सात राज्यांची बैठक

महाराष्ट्राला 720 कि.मी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.
Tarkarli Beach
Tarkarli BeachDainik Gomantak

महाराष्ट्राला खूप मोठी निसर्गरम्य सागरी किनारपट्टी लाभली आहे. याचा वापर पर्यटन विकासाच्या दृष्टीने केला जावा यासाठी जाहिरात करण्याचा प्रस्ताव तारकर्ली येथे झालेल्या चर्चासत्रात मांडण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या अर्थ व साख्यिकी विभागाने आयोजित केलेल्या या चर्चासत्रात महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर व लद्दाख या सात राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Tarkarli Beach
Vir Das:...तोपर्यंत विरोध कायम; गोव्यात कॉमेडियन वीर दास विरोधात हिंदू संघटना आक्रमक

महाराष्ट्राला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना मिळून 720 कि.मी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. ज्या राज्यांना सागरी किनारा लाभला नाही त्या राज्यातील पर्यटकांना सागरी किनारपट्टीचे मोठे आकर्षण असते. महाराष्ट्रातील सागरी पर्यटनाची अशा राज्यात जाहिरात झाल्यास त्या राज्यातील पर्यटक महाराष्ट्रात येऊन राज्याचा पर्यटन व्यवसाय वाढू शकतो. तसेच, देशाच्या उत्पन्नात देखील वाढ होईल. त्याअनुषंगाने धोरण तयार केले जावे असा प्रस्ताव या चर्चासत्रात मांडण्यात आला.

Tarkarli Beach
53rd Iffi Goa: मधुर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाऊन'चा इफ्फीत वर्ल्ड प्रीमियर 

यामुळे महाराष्ट्रातील सागरी किनारे व सृष्टीसैंदर्य यामुळे पर्यनाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायाचा राज्याच्या उत्पन्नात मोठा वाटा आहे. राज्याचा पर्यटन व्यवसाय अजून वाढला तर, त्याचा फायदा निश्चित होईल त्याअनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान, या चर्चासत्रात विविध विषयावर सखोल अभ्यासपुर्ण चर्चा आणि सांख्यिकीय माहितीचे देखील आदानप्रदान करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com