शिवसेनेतील बंडखोरीमागे खरा सूत्रधार कोण ? पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं थेट उत्तर

हे सगळं कारस्थान आहे, त्याचा सूत्रधार कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे
Prithviraj Chavan News | Prithviraj Chavan on ShivSena
Prithviraj Chavan News | Prithviraj Chavan on ShivSenaDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील अंतर्गत राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप - प्रत्योरोपाने हे वातावरण ढवळून निघाले आहे. तर संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेणे सुरु केलंय तसेच शिंदे गटातील काही नेत्यांनी संजय राऊत हतबल झाल्याने अशी वक्तव्य करत असल्याचं म्हटले आहे.(Prithviraj Chavan News)

असे असले तरी या साऱ्या घडामोडी मागे खरा सूत्रधार कोण ? याबद्दल संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. मात्र आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याचा थेट खुलासा केला आहे. ( Prithviraj Chavan Said Bjp leader Devendra Fadnavis is real mastermind behind shiv Sena rebel )

Prithviraj Chavan News | Prithviraj Chavan on ShivSena
“टरबुजाने बंडखोर आमदारांवर 7 हजार कोटी खर्च केले''

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमागे भारतीय जनता पार्टीचा सहभाग असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी केला आहे. यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट नावच घेतलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, “हे बघा, हे सगळं जे कारस्थान आहे, त्याचा सूत्रधार कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे. दर दिवसाआड देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातात, अमित शाहांना भेटतात, नड्डांना भेटतात, आणखी कुणाला भेटतात. पुढची रणनीती आखतात. ईडीचं काय करायचं ? कुणावर कसा दबाव टाकायचा ? त्यानंतर साधनसामग्रीची व्यवस्था करतात.

दर दोन दिवसाला हे सुरू आहे. त्यामुळे याचा सूत्रधार कोण आहे ? याचा कर्ता करवीता कोण आहे ? हे आता स्पष्ट झालं आहे. याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा बैठका झाल्या असतील, उद्या परवा पुन्हा बैठका होतील,” असंही ते म्हणाले

Prithviraj Chavan News | Prithviraj Chavan on ShivSena
Maharashtra: बंडखोर आमदार गुवाहाटीत इनडोअर गेम्समध्ये मशगुल

पुढे बोलताना चव्हाण यांनी सांगितलं की, “सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील राजकीय स्थिती जैसे थे ठेवायला सांगितली आहे. याचा अर्थ कुणीच काही करू नका, ११ जूनला सुनावणीच्या दिवशी त्याच प्रकारची परिस्थिती असायला हवी,” असं न्यायालयाने सांगितलं आहे. असं असताना विधान सभेत अविश्वास ठराव आणला जाईल, अशी चर्चा सुरू आहे. पण यामध्ये अनेक घटनात्मक पेच असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com