राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज रत्नागिरी दौरा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत.
President Ramnath Kovind's Visit To Ratnagiri Today
President Ramnath Kovind's Visit To Ratnagiri Today Dainik Gomantak

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) आज रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या (President Ramnath Kovind's Visit To Ratnagiri Today) दौऱ्यावरती आहेत. यावेळी ते मंडणगड तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेले आंबडवे या गावाला भेट देणार आहेत तर हा, राष्ट्रपतींचा दौरा ऐतिासिक असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता आजची राष्ट्रपतींची आंबडवे गावाला भेट ही अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण असणार आहे. मंडणगड शहराशिवाय आंबडवे गावच्या परिसराला छावणीचे स्वरूपाचे चित्र आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्भूमीवर रत्नागिरी आणि आंबडवेला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती वाहतुकीत देखील मोठे बदल करण्यात आले आहेत.

President Ramnath Kovind's Visit To Ratnagiri Today
मुंबईत एक कोटी रुपयांच्या अंमली पदार्थासह नायजेरियन पेडलरलला अटक

म्हाप्रल चेकपोस्टकडून शेनाळेमार्गे मंडणगडकडे येणारी वाहतूक शेणाले फाट्यापासून बंद राहणार आहे तर, खेड दापोली शहरामध्ये दापोली फाटामार्गे प्रवेश करणारी वाहतूक कुंबळे फाट्यापर्यंत बंद राहणार. बाणकोटकडून पाचरळ फाटामार्गे मंडणगड शहराकडे येणारी वाहतूक पाचरळ फाट्यापर्यंत पूर्ण बंद असणार आहे. बाणकोट कडून पाचरळ फाटा तसेच म्हापरळ, शेनाले फाट्यामार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. म्हाप्रळ पेवे पंदेरीमार्गे बाणकोटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या दरम्यान, राष्ट्रपतींच्या बंदोबस्तासाठी 118 अधिकारी, 800 पोलीस अंमलदार, 200 होमगार्ड, 1 हजार 118 पोलीस, जलद कृतीदल, दंगा काबू पथक, एस आर पी एफ तुकड्या आणि बॉम्ब शोधक पथके तैनात करण्यात आले आहे.

राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या आंबडवे दौऱ्यानिमित्त मंडणगडात छावणीचे रूप आले, आंबडवेत त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 12 फेब्रुवारी हा दिवस मंडणगड तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. कारण या दिवशी देशाचे राष्ट्रपती मंडणगड तालुक्यात येतील. या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पूर्वतयारी चालु आहे. राष्ट्रपतांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने तालुकावासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका हा सातत्याने विकासापासून वंचित आणि दुर्लक्षित राहिलेला आहे. कोणत्याही नेतृत्वाने मंडणगड तालुक्याच्या विकासाकडे, मूलभूत सुविधांकडे लक्ष दिले नाही.

President Ramnath Kovind's Visit To Ratnagiri Today
Goa Election 2022: आदित्य ठाकरे म्हणाले... 'वाघांचा बाजार नसतो'

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे हे मंडणगड तालुक्यातील आहे, आणि हे तालुक्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 2014-15 ला भाजपचे राज्यसभेचे तत्कालीन खासदार अमर साबळे यांनी संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून हे आंबडवे गाव दत्तक घेतले होते. गावासह ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावांचा 355 कोटींचा विकास आराखडा तयार केला मात्र आता तो आराखडा आजही कागदावरच आहे. कोट्यावधींची ही उड्डाणे प्रत्यक्षात न देता केवळ हवेतच बांधली आहेत. याबाबत तालुकावासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचे मूळ गाव आंबडवे येथे आलिशान सभामंडप उभारण्यात आला आहे. या आलिशान सभागृह मंडपात केवळ मोजक्या लोकांनाच प्रवेश असणार आहे. ज्यांना अधिकृत प्रवेश दिला जाणार आहे त्यांची आधी कोरोना चाचणी केली जाणार आहे. आंबडवे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका भोवती रंगरंगोटी केली गेली आहे. स्मारकाच्या आतील बाजूला नवीन विज खांबांच्या जोडण्या करण्यात आल्या आहेत. तर शिरगाव ते आंबडवे दरम्यान 22 किमीच्या रस्त्याच्या दुतर्फा मार्गावरती स्वच्छता केली गेली आहे. रस्त्याच्या दोन्हीं बाजूला पट्ट्या मातीचे भराव टाकून रेलिंग केली जात आहे. या दरम्यान सार्वजनिक वाहतुकीसाठी रस्ता पूर्णतःबंद राहील. मंडणगड नगर पंचायतीचे कर्मचाऱ्यांनी शहरातील संपूर्ण रस्ते स्वच्छ केले आहेत.

President Ramnath Kovind's Visit To Ratnagiri Today
उनका बयान देखकर मुझको आती हँसी...; थरुर यांच्यावर आठवलेंची भन्नाट कविता

आंबडवे येथील महाविद्यालयाच्या इमारतीला, वर्ग खोल्यांना पहिल्यांदा रंगरंगोटी केली गेली आहे. आंबडवे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असले तरी आतापर्यंत राजकीय नेत्यांच्या घोषणा वगळता या गावच्या विकासाच्या वाट्याला कायम उपेक्षाच आली, अद्यापही हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आणि दुर्लक्षित राहीले आहे. या गावात कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे, पण तेथे वैद्यकीय अधिकारी नाही. तरीही या शासनाच्या इमारतींना रंगरंगोटी केली गेली आहे. तर लोणंद राजेवाडी ते आंबडवे हा राष्ट्रीय महामार्ग निधी मंजूर होऊन त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com