27 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुणे दौऱ्यावर

शुक्रवारी बालगंधर्व रंगमदिरात दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती हजेरी लावणार आहेत.
Ram Nath Kovind Pune Visit
Ram Nath Kovind Pune VisitDainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) गुरुवारी पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तयारीचा सर्व आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व विभागांची बैठक घेतली आणि गुरुवारी राष्ट्रपतींचा मुक्काम पुण्यातच असणार आहे. शुक्रवारी बालगंधर्व रंगमदिरात दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती हजेरी लावणार आहेत. (President Ramnath Kovind to visit Pune on May 27)

Ram Nath Kovind Pune Visit
सिंधुदुर्गातील मालवणजवळ समुद्रात बोट उलटली ; अनेकांचा मृत्यू ,बचावकार्य सुरू

गुरुवारी 26 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपतींचे विमानतळावर आगमन होणार आहे. पुण्यातील बुधवार पेठ येथीललक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी दुपारी 12 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थिती लावणार आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) या देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार 2022

यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार 2022 वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडणार आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आहे.

Ram Nath Kovind Pune Visit
लोणावळ्याच्या जंगलात ट्रेकिंगसाठी गेलेल्या अभियंत्याचा सापडला मृतदेह

यावेळी उद्यानकृषी क्रांतीच्या जनक आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरीच्या प्र-कुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ डॉ. प्राजक्ता काळे यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दत्तमंदिराच्या 125 वर्षांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या लक्ष्मीदत्त या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशीही माहिती कदम जहागिरदार यांनी यावेळी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com